महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये दक्षता जनजागृती सप्ताह साजरा.

महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये दक्षता जनजागृती सप्ताह साजरा.

*राहुरी विद्यापीठ, दि. 30 ऑक्टोबर, 2024*

 महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथे महाराष्ट्र शासनाच्या परिपत्रकानुसार दि. 28 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबर, 2024 या कालावधीत दक्षता जनजागृती सप्ताह साजरा करण्याविषयी कळविण्यात आले आहे. या अनुषंगाने आज दक्षता सप्ताह विद्यापीठात साजरा करण्यात आला याप्रसंगी महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी. जी. पाटील, अधिष्ठाता डॉ. दिलीप पवार, संशोधन संचालक डॉ. विठ्ठल शिर्के, विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्ष ससाणे, पदव्युत्तर महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. साताप्पा खरबडे व कुलसचिव डॉ. मुकुंद शिंदे उपस्थित होते.

 यावेळी कुलगुरू डॉ. पी.जी. पाटील मार्गदर्शन करताना म्हणाले की प्रत्येक अधिकारी व कर्मचारी यांनी आपले काम प्रामाणिकपणे तसेच कशाचीही अपेक्षा न ठेवता केले पाहिजे. प्रत्येकाने लाचखोरीविषयी जागृत राहिले पाहिजे असे यावेळी ते म्हणाले. यावेळी उपस्थितांना कुलसचिव डॉ. मुकुंद शिंदे यांनी भ्रष्टाचार निर्मुलनाची शपथ दिली. यावेळी ते म्हणाले की या दक्षता जनजागृती सप्ताहाचा या वर्षीचा आशय राष्ट्राच्या समृध्दीसाठी अखंडतेची संस्कृती असा आहे. यावेळी विद्यापीठातील सर्व विभाग प्रमुख, शास्त्रज्ञ, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.