नेवासा परिसरातील वाळु तस्कर व सराईत गुन्हेगार एमपीडीए कायदयान्वये स्थानबध्द मा. जिल्हादंडाधिकारी, अहिल्यानगर यांचे आदेश
नेवासा परिसरातील वाळु तस्कर व सराईत गुन्हेगार एमपीडीए कायदयान्वये स्थानबध्द
मा. जिल्हादंडाधिकारी, अहिल्यानगर यांचे आदेश
नेवासा तालुका पोलीस स्टेशन हद्दीमध्ये कुंभारगल्ली, नेवासा खुर्द येथे राहणारा सोमनाथ आसाराम हिवरे, वय 28 वर्षे याने नेवासा, शनि शिंगणापुर व शेवगाव पोलीस स्टेशन हद्दीत व परिसारात त्याचे साथीदारांसह सरकारी नोकराचे शासकीय कामात अडथळा निर्माण करुन वाळुची चोरी करणे असे गंभीर स्वरुपाचे शरीराविरुध्दचे व मालाविरुध्दचे गुन्हे करुन तेथील राहणारे सर्व सामान्य लोकांवर दहशत निर्माण केलेली होती. त्यामुळे नेवासा, शनि शिंगणापुर व शेवगाव पोलीस स्टेशन तसेच आजुबाजुच्या परिसरात सार्वजनीक सुव्यवस्थेस बाधीत झाली होती. सराईत गुन्हेगार सोमनाथ आसाराम हिवरे, वय 28 वर्षे याचे समाजविघातक कृत्यांना आळा घालण्यासाठी प्रचलीत कायदयान्वये करण्यांत आलेल्या प्रतिबंधक कारवाया अपुऱ्या व कुचकामी ठरत होत्या. त्याचे गुन्हेगारी कृत्यांना प्रतिबंध होण्यासाठी पोलीस निरीक्षक, श्री. धनंजय जधव, नेवासा तालुका पोलीस स्टेशन यांनी एम.पी.डी.ए. कायदयान्वये प्रस्ताव तयार करुन श्री. सुनिल पाटील, उप विभागीय पोलीस अधिकारी, शेवगाव उप विभाग यांचे व श्री. वैभव कलुबर्मे, अपर पोलीस अधीक्षक, श्रीरामपुर यांच्या मार्फत मा.श्री.राकेश ओला, पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांना सादर केला होता.
सदर प्रस्तावाची मा.श्री.राकेश ओला, पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांनी बारकाईने पडताळणी करुन सदरचा प्रस्ताव हा शिफारस अहवालासह मा.जिल्हादंडाधिकारी, अहिल्यानगर यांना सादर केला होता.
सराईत गुन्हेगार सोमनाथ आसाराम हिवरे, वय 28 वर्षे याचे विरुध्द शररीराविरुध्दचे व वाळु चोरीचे गंभीर स्वरुपाचे 05 गुन्हे दाखल आहेत.
नमुद प्रस्तावांची व सोबतच्या कागदपत्रांची मा.श्री. सिध्दाराम सालीमठ, जिल्हादंडाधिकारी, अहिल्यानगर यांनी पडताळणी करुन अहिल्यानगर जिल्हयातील सार्वजनीक सुव्यवस्था अबादित राहावी याकरीता सराईत गुन्हेगार सोमनाथ आसाराम हिवरे, वय 28 वर्षे , रा.कुंभारगल्ली, नेवासा खुर्द,ता.नेवासा,जि.अहिल्यानगर यास स्थानबध्द करणे बाबतचे आदेश काढले असुन त्याप्रमाणे पोलीसांनी त्यास ताब्यात घेवुन नाशिक मध्यवर्ती कारागृह, नाशिक येथे स्थानबध्द केले आहे.
सदर कारवाई मा. श्री. राकेश ओला, पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री.दिनेश आहेर, स.फौ. रविंद्र पांडे, पोहेकॉ सुरेश माळी, फुरकान शेख, पोकॉ किशोर शिरसाठ, सोमनाथ झांबरे तसेच नेवासा पोलीस स्टेशन येथील पोसई श्री. सुनिल जरे यांनी केली आहे.
सध्या विधानसभा आदर्श आचारसंहिता लागु असुन दरम्यानच्या कालावधीमध्ये अहिल्यानगर जिल्हयातील सराईत गुन्हेगार, वाळु तस्कर तसेच संघटीतपणे गुन्हे करणा-या टोळीच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यात येत असुन सराईत गुन्हेगारांनी निवडणुक कालावधीत गुन्हे करुन आचार संहिता भंग करण्याचा प्रयत्न केल्यास त्यांचा बिमोड करण्यासाठी त्यांचेवर प्रचलित कायदयान्वये कठोर कारवाई करण्याचे संकेत मा.श्री. सिध्दाराम सालीमठ, जिल्हादंडाधिकारी, अहिल्यानगर व मा.श्री.राकेश ओला, पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांनी दिलेले आहेत.