लोकसहभाग मधून साधला जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुंगसे वस्ती (लाल गेट )केंद्र देडगाव शाळेचा विकास.
*लोकसहभागातून साधला जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुंगसेवस्ती, केंद्र देडगांव ता. नेवासा जिल्हा- अहमदनगर शाळेचा विकास*
नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव या गावातील मुंगसेवस्ती( लाल गेट )शाळेला देडगाव ग्रामपंचायतमार्फत अंतर्बाह्य रंगकाम करण्यात आले. त्यांनतर मुंगसेवस्ती शाळेतील मुख्याध्यापक श्री.रविराज चौरे सर व शिक्षक श्री. भाऊसाहेब चंदन सर आणि येथील ग्रामस्थांनी एकत्र येऊन शाळेच्या भिंतीवर लोकसहभागातून आणखी शालेय अभ्यासक्रमाच्या चित्रांसह रंगरंगोटी करण्याचे ठरविले. चित्रे व रंगकामासाठी शालेय अभ्यासक्रमासह छत्रपती शिवाजी महाराज, गड, किल्ले, राष्ट्रीय प्रतिके अशी थीम घेण्याचे ठरले. अल्पावधीतच श्री सोनवणे पेंटर यांनी उत्कृष्टपणे शाळेचे रंगकाम पूर्ण केले.
या कामी देडगाव चे विद्यमान सरपंच चंद्रकांत पाटील मुंगसे ,उपसरपंच ल
क्ष्मणराव गोयकर व सर्व सदस्य व परिसरातील ग्रामस्थांनी सहकार्य करून एक उत्कृष्ट शाळा उभारणीत आपला हातभार लावला. यामध्ये श्री. मोहनतात्या मुंगसे, श्री. राजेंद्र मुंगसे, श्री. विठ्ठल मुंगसे, श्री. भाऊसाहेब मुंगसे, श्री. पांडुरंग मुंगसे, श्री. सुंदरदास मुंगसे, श्री अशोक मुंगसे, श्री. लक्ष्मण लवांडे, श्री अशोक मोहळकर, श्री. गोरक्षनाथ मारकड, श्री. गणपत मुंगसे सर, श्री. गणेश मुंगसे, श्री. दत्तात्रय मुंगसे, श्री. ज्ञानदेव मुंगसे, श्री. आप्पा ससे, श्री. गंगाधर बावधनकर, श्री. तुकाराम मुंगसे, श्री. सारंगधर मुंगसे, श्री. कानिफनाथ मुंगसे, श्री. नानासाहेब पटारे, श्री. संजय मुंगसे, श्री. बंडू मुंगसे, श्री. शंकर सोनवणे, श्री. सूर्यभान सोनवणे, श्री राजाराम मुंगसे, श्री. नारायण मुंगसे, श्री.मारुती कुटे, श्री. आसाराम कुटे, श्री. देवदान हिवाळे, श्री राजू हिवाळे, श्री. सत्यदान हिवाळे, श्री.संदीप हिवाळे, श्री. मोहन सोनवणे, श्री. भागवत टाके, श्री. सुरेश टाके, श्रीमती समाबाई मुंगसे, श्री. दशरथ गडाख, श्री. नारायण खरात, श्री. हरिभाऊ खरात, श्री. शिवाजी तिडके, श्री. अशोक कोल्हे, श्री. किशोर बताडे, श्री. शंकर बताडे, श्री. पंडूरे सर, श्री. कुसळकर गोपीनाथ आदी लोकांनी सहकार्य करून समाजापुढे एक आदर्श ठेवला.
शाळेच्या वतीने शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री. सुभाष मुंगसे यांनी सर्व ग्रामस्थांचे आभार मानले.