राष्ट्रपती दौरा अन् महामार्ग मलमपट्टी. सा बां विभागाचा प्रताप बारा तासात खड्डे पुन्हा उखडले.
राष्ट्रपती दौरा अन् महामार्ग मलमपट्टी.
सा बां विभागाचा प्रताप
बारा तासात खड्डे पुन्हा उखडले.
घोडेगाव (वार्ताहर) महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु शनिशिंगणापूर दौरा गुरुवार दि 30नोव्हेंबर रोजी शनिदर्शन साठी होणार आहे. त्यामुळे नगर संभाजी नगर महामार्गावर एम आय डी सी ते घोडेगाव शनीचौक रस्त्यावर खडी मुरुम टाकुन तात्पुरती मलमपट्टी रविवारी दुपारी करण्यात आली .ती रविवारी संध्याकाळी झालेल्या बुरबुरीच्या पावसाने पुन्हा उखडली खड्डे उघडे पडले रस्त्यावर कच,खडी विखुरली आहे. खडी वरुन घसरुन अगर टायर खालुन खडे उडून अपघाताचा धोका वाढला आहे. बारा तासात रस्ता उखडलाच कसा असा सवाल ग्रामस्था मधुन व्यक्त होत आहे.
राष्ट्रपती साठी घोडेगाव पांढरी फुलं एम आय डि सी येथे हेलिपॅड तयार करण्यात आले आहे. एम आय डी सी घोडेगाव शनीचौकात राष्ट्रपती यांचा लवाजमा जाणार आहे . त्यामुळे महामार्गावर मलमपट्टी केली खरी पण ती बारा तास सुध्दा टिकुन शकली नसल्याने सार्वजनिक बांधकाम विभाग कारभाराचे वाभाडे निघाले आहेत. रस्त्यावर पाणी साचले आहे. रस्त्याच्या कडेच्या गटारी मधे पाणी वाहुन जात नसल्याने रस्त्यावर खड्डे पडत आहे. अनेक ठिकाणी दुर्गंधी पसरली आहे. दिवसा सुध्दा डास गुणगुणत असल्याने हिवताप ,मलेरिया सारखे आरोग्याचे प्रश्न वाढत आहेत .
सार्वजनिक बांधकाम विभागाने घोडेगाव मार्केट कमिटी ते शनीचौक दरम्यानचा रस्ता खड्डे मुक्त करावा ,साईड पट्ट्या सुधारणा करावी,गटारी वाहत्या कराव्यात. अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे.