चांगल्या कामाची पावती,राहुरी तालुक्यातील श्रीरामपूर विधानसभा 32 गावांची जबाबदारी देवेंद्र लांबे यांच्यावर .
*राहुरी तालुक्यातील श्रीरामपूर विधानसभा ३२ गावांची जबाबदारी देवेंद्र लांबे यांच्यावर*
शुक्रवार दिनांक २६ जुलै रोजी शिवसेना पक्षाचे उपनेते तथा श्रीरामपूर विधानसभा निरीक्षक डॉ राजेंद्र वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली श्रामपूर विधानसभेतील राहुरी तालुक्यातील ३२ गावांची बैठक राहुरी कारखाना येथे संपन्न झाली.
या बैठकीस शिवसेना उत्तर नगर जिल्हाप्रमुख नितीनराव औताडे,शिवसेना उत्तर संपर्कप्रमुख बाळासाहेब पवार, शिवसेना युवा नेते प्रशांत लोखंडे, शिवसेना अनुसूचित जाती जमातीचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख भाऊसाहेब पगारे मा.आ.भाऊसाहेब कांबळे उपजिल्हाप्रमुख जयवंत पवार उपस्थित होते.
या बैठकीस संबोधित करताना डॉ.राजेंद्र वाघमारे यांनी राहुरी तालुक्यातील ३२ गावांमध्ये शिवसेना पक्षाच्या वाटचाली संदर्भात मार्गदर्शन केले. या बैठकीस श्रीरांमपूर विधानसभेमध्ये जोडले गेलेले ३२ गावांमधून आगामी विधानसभा निवडणुकीत जास्तीत जास्त मतदान शिवसेना पक्षाच्या उमेदवाराला कसे होईल यासाठी काम करण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच महाराष्ट्र राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षाचे मुख्यनेते एकनाथजी शिंदे यांच्या माध्यमातून राबविण्यात आलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना, मुख्यमंत्री लाडका भाऊ योजना तसेच महायुती सरकारच्या काळात घेण्यात आलेल्या निर्णयांचा लाभ तळागाळापर्यंत नागरिकांना पोहोचवण्याचे आदेश देण्यात आले. श्रीरामपूर विधानसभेतील राहुरीच्या ३२ गावांचे संघटनात्मक बांधणीचे नियोजन शिवसेना राहुरी तालुकाप्रमुख देवेंद्र लांबे यांच्याकडे देण्यात आली आहे.
या बैठकीस शिवसेना अनुसूचित जाती जमाती जिल्हाध्यक्ष किशोर वाघमारे, वसंत कदम ॲड.निलेश धुमाळ,संकेत होले, प्रशांत खळेकर बाळासाहेब कदम,वसंत कदम, सनी जगताप,अनिल पलघडमल, राजन ब्राह्मणे,रोहित नालकर,सोमनाथ धुमाळ,अशोक तनपुरे,नानासाहेब कानडे,विशाल कदम,चांगदेव पवार,महिला आघाडी प्रमुख सौ वनिता जाधव,मुकुंद कड,सुनील जगताप आदी उपस्थित होते.