संभाजीनगर जिल्हा परिषद बांधकाम विभागात चालतोय सावळा गोंधळ, माहिती अधिकार कायद्याचे वाजवले तीन तेरा नऊ बारा .

संभाजीनगर जिल्हा परिषद बांधकाम विभागात चालतोय सावळा गोंधळ, माहिती अधिकार कायद्याचे वाजवले तीन तेरा नऊ बारा .

छत्रपती संभाजी नगर

संभाजीनगर च्या जिल्हापरिषद बांधकाम विभागात चालतोय सावळा गोंधळ  

देख तेरे संसार की हालत . . . . कोणी कितीही माहिती अधिकार टाका,आमचे काहीही होऊ शकत नाही .संभाजीनगर येथील जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातील हा सावळा गोंधळ असून या प्रकारामुळे माहिती अधिकार कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट पसरली आहे .तसेच जन माहिती आधिकाऱ्यांनां पाठीशी घालण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत चालल्याचे दिसून येत आहे . या ठिकाणी अपिल सुनावणी दरम्यान चालते उडवाउडवी . (माहिती अधिकार कायद्याला येथे मानच नाही , हा कायदा होतोय अपमानित )

 

         संभाजीनगर जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या बांधकाम उपविभाग कार्यालयास माहिती अधिकार 2005 जोडपञ "अ" नुसार माहिती मागविली असता सदरील माहिती विहित वेळेत न मिळाल्यास माहिती अधिकार 2005 च्या जोडपञ " ब "नुसार जिल्हा परिषदेच्या संभाजीनगर च्या जिल्हा कार्यालयातील बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्याकडे अपिल केली असता अपिलाची सुनावणी घेते वेळी कार्यकारी अभियंता मा.श्री . पी . आय . ठाकरे हे संबधित जनमाहिती अधिकारी हे सुनावणीस हजर नसतांना देखील त्यांची पाठराखण करत माहिती आधिकार कार्यकर्त्यांना थातुर मातुर उत्तरे देऊन अर्ज निकाली काढण्याचा प्रकार कार्यकारी आभियंता श्री . पी .आय .ठाकरे हे करत आहे तरी संबधित वरिष्ठ अधिकार्‍यांनीं लवकरात लवकर लक्ष्य देऊन हा प्रकार थांबवुन न्यायालयाने पारित केलेल्या माहिती अधिकार कायद्याची व माहिती आधिकार कार्यकर्त्यांची हेळसांड करु नये अशी मागणी संभाजीनगर जिल्ह्यातील विविध संघटने कडुन व माहिती अधिकार कार्यकर्त्यांकडुन होत आहे .