श्री बालाजी कॉम्प्युटर्स मध्ये MSCIT आणि CCC विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न.

श्री बालाजी कॉम्प्युटर्स मध्ये MSCIT आणि CCC विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न.

*श्री बालाजी कॉम्प्युटर्स मध्ये MSCIT आणि CCC विद्यार्थीचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न*

बालाजी देडगाव :- (प्रतिनिधी युनूस पठाण) नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील श्री .बालाजी कॉम्प्युटर्स ही संस्था गेली 10 वर्ष देडगाव येथे कार्यरत आहे. या संस्थे मध्ये अनेक योजना राबविण्यात येतात. या मध्ये प्रामुख्याने विद्यार्थ्यांना संगणकांचे शिक्षण तसे शेतकऱ्यांचे ऑनलाईन अर्ज करणे व भरती साठी प्रयत्न करणाऱ्या विद्या्थ्यांसाठी साठी मार्गदर्शन देण्याचे काम करते. तेही अल्प दरात मध्ये सेवा देण्यात येते. त्यामुळे या संस्थेचे नाव संपूर्ण परिसरात नावाजलेले आहे.  

         संस्थेचे संस्थापक शंकर गोयकर सर हे संगणकातील सर्वोच्च पदवी (MCA) मिळवलेले असून त्यांना अनेक वर्षांचा संगणकामध्ये अनुभव आहे. तसेच त्यांच्या साथीला सौ.प्रियंका मॅडम याही तेवढ्याच शिक्षित असून मुलींना मोलाचे मार्गदर्शन करतात. आज या संगणक केंद्राच्या MSCIT आणि CCC विद्यार्थीचा निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता .या कार्यक्रम प्रसंगी चाईल्ड करिअर शाळेचे संस्थापक सागर बनसोडे सर अध्यक्ष म्हणून लाभले , तसेच खंडू कोकरे सर, कचरू तांबे व अशोक कदम हे प्रमुख मान्यवर उपस्थित होते. 

यावेळी प्रमुख मान्यवरांचा व गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.

            कार्यक्रमाचे अध्यक्ष सागर बनसोडे सर यांनी विद्यार्थ्यांना भविष्यामध्ये उपलब्ध असणाऱ्या संधी यावर मार्गदर्शन करत, मुलांनी अभ्यासामध्ये सातत्य ठेवावे व जीवनाचे ध्येय गाठण्यासाठी सतत प्रयत्नशील राहावे. मनात जिद्द असेल तर नक्की यश खेचून आणता येते अशा अनेक गोष्टीवर योग्य मार्गदर्शन करत त्यांनी विद्यार्थ्यांना पुढील जीवनाच्या शुभेच्छा दिल्या. खंडू कोकरे सर यांनी विद्यार्थ्यांना संगणकाचे महत्त्व पटवून दिले. तसेच शंकर गोयकर सर यांनी विद्यार्थ्यांना डिजिटल युगा बद्दल मार्गदर्शन केले. त्यानंतर गिरीश तांदळे, ज्ञानेशरी तांबे, वैष्णवी मुंगसे, सृतिका बनसोडे, सुधिक्षा रक्ताटे, बाबासाहेब दळवी या विद्यार्थ्यांचे मनोगत झाले. कार्यक्रम प्रसंगी कचरु तांबे, अशोक कदम, प्रदीप गोयकर, विकास तांबे, रोहन हिवाळे, महेश नांगरे, आदिनाथ हंडाळ, विलास तांबे व आदी मान्यवर उपस्थित होते. 

       या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थी शुभम जगधने यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन राज काळे यांनी मानले.