बालाजी देडगाव येथे कोकरे वस्ती वर अखंड हरिनाम सप्ताहास प्रारंभ.

बालाजी देडगाव येथे कोकरे वस्ती वर अखंड हरिनाम सप्ताहास प्रारंभ.

बालाजी देडगाव :- (प्रतिनिधी युनूस पठाण)नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथे सालाबाद प्रमाणे 29 वर्षापासून आदर्श कोकरे वस्ती येथे बाबीर बुवा च्या कृपाशीर्वादाने व ह भ प सुखदेव महाराज मुंगसे यांच्या प्रेरणेने व ह भ प सदाशिव महाराज पुंड यांच्या अधिपत्याखाली अखंड हरिनाम सप्ताह मोठ्या उत्साहात संपन्न होत आहे.

          या सप्ताहामध्ये श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी अठरा अध्याय गीता पारायण व दैनंदिन पहाटे 4 ते 5 काकडा ,8 ते 11 ज्ञानेश्वरी पारायण सोहळा, सायंकाळी 5 ते 6 हरिपाठ व रात्री 7 ते 9 हरिकीर्तन व जागर असा सोहळा पार पडत आहे.

        पहिल्या दिवशी ह भ प सुखदेव महाराज मुंगसे व दुसऱ्या दिवशी हभप सूर्यभान महाराज केसभट यांची कीर्तन रुपी सेवा झाली व आज सायंकाळी ह भ प लक्ष्मण महाराज नांगरे यांची कीर्तन सेवा होणार असून भाविकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे. 

      उद्या रविवार रोजी ह भ प लक्ष्मण महाराज ब्राह्मणे यांचे कीर्तन रुपी सेवा होणार आहे.

      हा अखंड हरिनाम सप्ताह परिसरात अत्यंत शिस्तप्रिय व लोकप्रिय म्हणून ओळखला जातो. त्यानिमित्ताने दानशूर व्यक्ती रोज सकाळी व सायंकाळी महाप्रसादाची पंगत देतात व सर्व भाविक आनंदाने हरी गजराच्या नामात प्रसादाचा आनंद घेत असतात.

        अखंड हरिनाम सप्ताहाला समस्त ग्रामस्थ भजनी मंडळ मोलाचे कष्ट घेत सहकार्य करत आहे

त.