बळीराज्य संघटनेकडून नवनिर्वाचित सोसायटी अध्यक्ष रामदास तांबे व उपाध्यक्ष भिऊबाई गोयकर यांचा सन्मान.
बालाजी देडगाव: -
(प्रतिनिधी युनूस पठाण)नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथे काल विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी च्या अध्यक्षपदी रामदास तांबे तर उपाध्यक्षपदी भिऊबाई रामनाथ गोयकर यांची निवड झाल्याबद्दल बळीराज्य संघटनेच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी बळीराज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मच्छिंद्र मुंगसे यांनी नवनिर्वाचित अध्यक्ष व उपाध्यक्ष यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत त्यांचे अभिनंदन केले. बळीराज्य संघटना ही महाराष्ट्रभर शेतकऱ्यांसाठी काम करते .म्हणून या संस्थेवर शेतकऱ्याचे भूमिपुत्र यांची निवड झाली म्हणून त्यांचा संघटनेच्या वतीने गौरव करण्यात आला.
यावेळी श्री संत रोहिदास देवस्थानचे संस्थापक ज्येष्ठ पत्रकार बन्सीभाऊ एडके , युवा नेते निलेश कोकरे यांनी आपले मनोगत व्यक्त करत त्यांना शुभेच्छा दिल्या.
या सन्मान सोहळ्याप्रसंगी ह भ प राजाराम महाराज मुंगसे, ज्येष्ठ नेते रघुनाथ कुटे , प्रगतशील शेतकरी सुरेश दादा कुटे, आदर्श शिक्षक राजीव कोकरे सर, भारत कोकरे ,अँड अजित पठाण, वंचित बहुजन आघाडीचे उत्तम सकट बाबासाहेब देवकाते , महादेव कदम,
अशोक पाटील मुंगसे,अनिकेत मुंगसे व आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी निलेश भाऊ कोकरे युवा मंच ,श्री संत रोहिदास देवस्थान, वंचित बहुजन आघाडी, पत्रकार संघटना अशा विविध संघटनेच्या वतीने नवनिर्वाचित अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचा सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार पत्रकार युनूस पठाण यांनी मानले.