राहुरी तालुका प्रशासनाच्या वतीने म.फु.कृ.वि येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव वर्षानिमित्त शालेय सांस्कृतिक नृत्य स्पर्धेचे आयोजन .

राहुरी तालुका प्रशासनाच्या वतीने म.फु.कृ.वि येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव वर्षानिमित्त शालेय सांस्कृतिक नृत्य स्पर्धेचे आयोजन .

संपूर्ण भारतदेशात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा करण्यात आला आहे . हा उत्सव साजरा करताना राहुरी तालुक्याने आगळी वेगळी छापच महाराष्ट्रभर सोडली आहे. याचे मुख्य कारण म्हणजे राहुरी प्रशासनाच्या वतिने स्वातंत्र्याच्या ७५ व्या अमृत महोत्सव दिना निमित्त म.फु.कृ.विद्यापीठ येथील नानासाहेब पवार सभागृह येथे तालुका स्तरीय जि.प. प्राथमिक शाळा व माध्यमिक शाळा अंतर्गत भव्य देशभक्तीवर आधारीत नृत्य अविष्कार स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

                  दि.१६ ऑगस्ट २०२२ व दि.१७ ऑगष्ट २०२२ दु. ४.०० ते रात्री १०.०० वाजे पर्यंत या कार्यक्रमाची रूपरेषा करण्यात आली आहे . या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण सुप्रसिदध गायिका ( सारेगमप २०१७ ची विजेता ) अंजली गायकवाड तसेच या कार्यक्रमाचे प्रमुख अध्यक्ष जिल्हाधिकारी मा. डॉ.श्री राजेंद्र भोसले,प्रमुख पाहुणे जिल्हा पोलिस अधीक्षक मा.श्री मनोज पाटील , मुख्य कार्यकारी अधिकारी मा.श्री.अशिष येरेकर, विद्यापिठाचे कुलगुरू मा.डॉ.श्री प्रशांतकुमार पाटील ,प्रमुख उपस्थीती उपविभागिय अधिकारी मा.श्री अनिल पवार,विद्यापिठ कुलसचिव मा.श्री.प्रमोद लहाळे,

उपविभागिय पोलिस अधिकारी मा.श्री संदिप मिटके या सुंदर कार्यक्रमाचे आयोजन करणारे राहुरी येथील कर्तव्य दक्ष तहसिलदार मा.श्री.एफ.आर.शेख,मा.श्री. बाळासाहेब ढवळे गट विकास अधिकारी ता.राहुरी.

तसेच ता.राहुरीचे कर्तव्य दक्ष पोलिस निरिक्षक मा.श्री प्रताप दराडे या सर्व महान रत्नांच्या उपस्थितित हा कार्यक्रम संपन्न झाला आहे .

        डिग्रस ग्रामपंचायत असणाऱ्या म.फु.कृ.विद्यापीठ येथे प्राथमिक व माध्यमिक शाळेचा असा पहिलाच कार्यक्रम आयोजित करण्यात आल्यामुळे विद्यार्थी व पालक यांच्यामध्ये आनंद निर्माण झाला असून त्यांनी आयोजकांचे विशेष आभार मानले आहे . सर्व कलावंत विद्यार्थ्यांनी विशेष लक्षवेधी कला सादर करून या कार्यक्रमाची शोभा वाढवण्याचे काम केले आहे.यामध्ये प्रत्येक शाळेतील शिक्षकांचे योगदान मोठे असून हा उत्कृष्ठ असा कार्यक्रम सादर करण्यास खूप मोलाचे सहकार्य केल्याने त्यांचेही विशेष आभार मानण्यात येत आहे .७५ व्या अमृत महोत्सव कार्यक्रमाचा बक्षीस वितरणाचा कार्यक्रम मान्यवरांच्या हस्ते दि.१७ ऑगस्ट २०२२ रोजी सायंकाळी ८.०० ते १०.०० या वेळेत होणार आहे. 

             

                या अमृत महोत्सव कार्यक्रमास BPS LIVE NEWS NETWORK DELHI चे महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्हा अध्यक्ष श्री.कृष्णा गायकवाड व जिल्यातील सर्व प्रतिनिधीं तर्फे विशेष शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.