डीसीसी,नाशिक संघाने पटकावला शारदा व्हॉलीबॉल चषक-भरत पवार स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू.

कोपरगांव: येथील सोमैया विद्या विहार संचलित श्री शारदा इंग्लिश मिडीयम स्कूलच्या सुवर्ण महोत्सव निमित्ताने आयोजित केलेल्या १६ वर्षाखालील मुलांच्या व्हॉलिबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात डीसीसी,नाशिक संघाने राहता स्ट्रायकर्स संघाचा २-० ने पराभव करून शारदा व्हॉलिबॉल चषक पटकावला.
श्रीरामपूर,राहता,कोपरगाव, नेवासा,ओझर,नासिक आदी ठिकाणाहून १२ उत्कृष्ट संघाने या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला होता.या स्पर्धेतील पहिल्या उपांत्य फेरीच्या लढतीमध्ये राहता स्ट्रायकर्स संघाने अष्टविनायक ओझर संघावर रंगतदार झालेल्या सामन्यांमध्ये १५-१२,०८-१५ व १५-१३ ने मात करून अंतिम फेरीमध्ये प्रवेश केला. तर दुसऱ्या उपांत्य फेरीच्या लढतीत बलाढ्य डीसीसी नाशिक संघाने सेंट मेरी नेवासा संघावर १५-११ व १५-१२ ने मात करून अंतिम फेरीत धडक मारली. अंतिम सामन्यांमध्ये बलाढ्य डीसीसी संघाने राहता स्ट्रायकर्स संघाचा सरळ सेटमध्ये २५-१७ व २५-१८ने पराभव करून स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. स्पर्धेमध्ये आक्रमक खेळ करणारा नाशिकचा भरत पवारला स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून गौरविण्यात आले.
स्पर्धेचे पंचप्रमुख म्हणून नितीन बलराज,तर स्पर्धेचे पंच म्हणून धनंजय माळी,भूषण माळी, आर्यन उपाध्ये व आदित्य पटारे यांनी काम पाहिले.विजेत्या संघांना शाळेचे प्राचार्य श्री के एल वाकचौरे, क्रीडा मार्गदर्शक श्री राजेंद्र कोहकडे,उपप्राचार्या सौ शुभांगी अमृतकर,पर्यवेक्षिका सौ प्रज्ञा पहाडे, सौ पल्लवी ससाणे, सौ नैथिली फर्नांडिस,क्रीडा प्रमुख श्री धनंजय देवकर,श्री शिवप्रसाद घोडके तसेच इतर मान्यवरांच्या हस्ते चषक व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.
स्पर्धेचा अंतिम निकाल
विजेता: डीसीसी,नाशिक ₹ ५०००/- चषक व प्रमाणपत्र.
उपविजेता: राहता स्ट्रायकर्स ₹ ३०००/- चषक व प्रमाणपत्र.
तृतीय_क्रमांक : सेंट मेरी स्कूल नेवासा ₹ २०००/- चषक व प्रमाणपत्र.
चतुर्थ_क्रमांक: अष्टविनायक ओझर ₹ १०००/- चषक व प्रमाणपत्र.