बालाजी देडगाव येथे सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने आरोग्य वर्धीनी उपकेंद्रात माता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियान संपन्न.
नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथे सार्वजनिक आरोग्य विभाग नवरात्र उत्सव 2022 निमित्त आरोग्य वर्धीनी उपकेंद्र येथे महाराष्ट्रातील सर्व माता भगिनींसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर व मातृत्वाचा सन्मान हाच आपला अभिमान या मोहिमेच सकाळी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन झाले.
या वेळी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते या कार्यक्रमाची रेबिन कापून या मोहिमेस प्रारंभ झाला.
हा कार्यक्रम प्रगतशील शेतकरी नामदेव पुंड यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. मान्यवरांच्या हस्ते सावित्रामाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून दिप प्रज्वलन करण्यात आले . या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आरोग्य सेवक डॉ. प्रमोद चऱ्हाटे यांनी केले. तर अशा सेविका श्रीमती कोल्हे मॅडम, श्रीमती गोफणे मॅडम, श्रीमती कदम मॅडम, श्रीमती मुंगसे मॅडम, श्रीमती काकडे मॅडम, यांनी माता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियान व मातृत्वाचा सन्मान हाच आपला अभिमान या विषयावर व गरोदर मातेची काळजी, डिलिव्हरी नंतर सहा महिने स्तनपान आवश्यक आहे, होणारा कॅन्सर कसा टाळावा , शिबिराच्या माध्यमातून अनेक रोगाचे निदान करणे शक्य होऊ शकते अशा अनेक विवीध रोगविषई महिती या वेळी देण्यात आली.
यानंतर दिवसभर शिबिर घेउन अनेक महीला भगिनी यांचे ब्लड प्रेशर शुगर वेगळ्या रोगाचे निदान करण्यात आले यावेळी भरपूर महिलांनी या शिबिरामध्ये सहभाग घेतला होता.
या वेळी उपस्थित विद्यमान सरपंच स्वातीताई चंद्रकांत मुंगसे ,बन्सी पाटील मुंगसे, जेष्ठ पत्रकार बन्सी एडके, श्रीधर तिडके , माजी सरपंच दत्ता पाटील मुंगसे, ग्रामपंचायत सदस्य अशोक मुंगसे, महादेव पुंड ,सचिन मुंगसे ,श्री . सुरेश दादा कुटे , युवा नेते चंद्रकांत मुंगसे ,बाळासाहेब मुंगसे संभाजीराजे काजळे, सोसायटी संचालक संजय मुंगसे ,रामा तांबे ,कचरू तांबे ,किशोर वांढेकर , आरोग्य अधिकाऱ्यांच्या वतीने समुदाय आरोग्य अधिकारी डॉक्टर अजित गवळी , योगेश नांगरे ,डॉक्टर सपना निकम श्री डॉ.प्रकाश पाठक, श्रीमती अनिता सूर्यवंशी मॅडम ,श्रीमती सुलभा कळमकर मॅडम ,श्रीमती लिलाबाई शिंदे अंगणवाडी सेविका अनिता दळवी मॅडम, जिजाबाई नांगरे मॅडम, मदतनीस मिनाज पठाण, आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार युनूस पठाण यांनी केले तर आभार डॉ. येलवांडे सर यांनी मानले.