*सार्वजानिक बांधकाम विभागाचा भोंगळ कारभार! पुढे काम चालतय तर मागे रस्ता उधळतोय!!* *मार्च एन्डिंग चे कारण दाखवुन रस्त्याचे काम उरकते घेण्याचा प्रयत्न*
प्रतिनिधी :-श्रीरामपूर
*मार्च एन्डिंग चे कारण दाखवुन रस्त्याचे काम उरकते घेण्याचा प्रयत्न*
महाराष्ट्र राज्य क्रं. 51म्हणुन घोषीत असणारा व श्रीरामपुर वैजापुर तालुक्याला जोडणारा रस्त्याचा मधला टप्पा उंदिरगाव पासुन नाऊरकडे जाणार्या रस्त्याचे काम सार्वजानिक बांधकाम विभाग श्रीरामपुर कार्यालयाअंतर्गत ठेकेदार जगताप कंट्रक्शन या कंपनिकडुन चालु असुन या रस्त्याचे काम मार्च एण्डिंग आत पुर्ण करायचे आहे व बिल गुंतण्याचे कारण नागरिकांना दाखवुन अत्यंत निकृष्ठ दर्जाचे व धावपळीप्रमाणे चालु असुन पुढे रस्त्याचे काम चालतंय तर पाठीमागे पाचशे ते सहाशे मिटर पाठीमागे झालेला रस्ता उखडतोय यासंबधी काही नागरिकांनी वेळोवेळी माहीती व अर्ज संबधित कार्यालयाला देउनही कुठलीही कारवाई करण्यास अधिकारी तयार नाही यामुळे अधिकारी व ठेकेदाराची अर्थिक तडजोड झाली असावी अशी चर्चा हरेगाव उंदिरगाव माळेवाडी नाऊर व परिसरातुन ऐकावयास मिळत आहे तरी याकडे वरिष्ठ अधिकार्यानीं लवकरात लवकर लक्ष देऊन कारवाई आणि कार्यवाही करावी अशी मागणी होत आहे