न्यू इंग्लिश स्कूल शिरेगाव -खेडले परमानंद शाळेत पार पडला दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ.
प्रतिनिधी :-नेवासा,अहमदनगर
न्यू इंग्लिश स्कूल शिरेगाव-खेडले परमानंद तालुका नेवासा या ठिकाणी इयत्ता दहावीचा २०२१-२०२२ या शालेय शैक्षणिक
वर्षातील मुलांचा निरोप समारंभाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.
सोनई पोलीस स्टेशनचे ए .पी.आय सचिन बागुल सर , महाराष्ट्र बँकेचे सोनई शाखेचे मॅनेजर महेश बोरुडे सर त्याचप्रमाणे, महाराष्ट्र बँकेचे शेती विभाग प्रमुख अनिल ढगे सर हे या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते.
त्याचप्रमाणे शिरेगाव येथील ज्येष्ठ नागरिक लक्ष्मण प्रल्हाद जाधव शाळा समिती सदस्य, नयुम इनामदार शाळा व्यवस्थापन अध्यक्ष व पत्रकार संभाजी शिंदे आदी मान्यवर या कार्यक्रमानिमित्त उपस्थित होते.
यावेळी विद्यार्थ्यांनी शाळेबद्दल जो जिव्हाळा , आत्मीयता आहे तो आपल्या भाषणातून व्यक्त केला. त्याचप्रमाणे शिक्षकांनी सुद्धा आपल्या भावना व्यक्त केल्या.
जी मुले पोटच्या मुलासारखे डोळ्यासमोर वावरले दैनिक जीवनात त्यांच्याशी जे आपुलकीचे नाते तयार झालेले आहे ते निरोप समारंभाच्या निमित्ताने कंठ दाटून येऊन भाऊक करणारे आहे. अशा शब्दात शिक्षकांनी मुलां बद्दलची आपुलकीली, कृतज्ञतेची भावना व्यक्त केली.
यावेळी शाळेतील मा.मुख्याध्यापक श्री व्ही एम दरंदले सर व शिक्षक वृंद श्री जंगले बीआर सर, दरंदले एस डी सर, सोनवणे ए एस सर, दरंदले आर जे सर, पी .जी बेलेकर सर, पी एम गडाख सर, एस डी नन्नवरे सर, नवगिरे आर बी सर,लांघे सर ,काळोखे सर, होण मामा, माऊली तूवर असा शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद या कार्यक्रमासाठी उपस्थित होते.
त्यानंतर दहावीच्या मुलांना स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. शिक्षक व मुलांनी एकत्रित या कार्यक्रमाचा आस्वाद घेतला. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी ए .पी.आय बागुल सर यांनी भावी जीवनात कशी वाटचाल करावी. यासंबंधीची मार्गदर्शक अशी रूपरेषा स्वरूप माहिती मुलांना दिली.
निरोप देताना विद्यार्थ्यांनी शाळेसाठी सिलिंग फॅन भेट स्वरूपात दिले.
त्याचप्रमाणे बँक मॅनेजर महेश बोराडे सर व अनिल ढगे सर यांनी त्यांच्या जीवनात यशस्वी होण्यासाठी काय कष्ट घेतले व तुम्ही तुमच्या जीवनात यशस्वी होण्यासाठी कशी वाटचाल कराल यासंबंधीचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केले.
पत्रकार संभाजी शिंदे यांनी मुलांना मार्गदर्शन करताना सांगितले की भावी आयुष्याची जडणघडण करताना मोबाईलवर व्हिडिओ गेम व इतर गोष्टी बघण्यापेक्षा . आपले जीवन कसे घडवावे यासाठी स्पर्धा परीक्षा संबंधीचे यूट्यूब चैनल बघावे. त्यामुळे नक्कीच तुमचे जीवन परिपूर्ण होईल.
यावेळी शाळेचे माजी शिक्षक कर्डिले सर यांच्या यांच्या मुलावर जो दरोडेखोरांनी हल्ला केला होता व त्यामध्ये तो गतप्राण झाला होता अशा ओंकार कर्डिले याला उभे राहून सर्वांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोनवणे सर यांनी केले. प्रास्ताविक मुख्याध्यापक व्ही एम दरंदले सर यांनी केले तर आभार प्रदर्शन संतोष दरंदले सर यांनी केले.