शिर्डी दुहेरी हत्याकांडातील आरोपी बद्दल महत्वाची अपडेट.

शिर्डी दुहेरी हत्याकांडातील आरोपी बद्दल महत्वाची अपडेट.

शिर्डी हत्याकांडातील आरोपी विरुध्द मोक्का (MCOCA) कायदयातंर्गत कारवाई.

प्रतिनिधी_प्रसाद घोगरे_९३७०३२८९४४.

सविस्तर_शिर्डी पोलीस स्टेशन हददीत दिनांक ०३/०२/२०२५ रोजी पहाटेचे सुमारास चोरीच्या उद्देशाने दोन व्यक्तींचां निर्घृण पणे खून केला होता, तसेच एका व्यक्तीवर गंभीर वार करण्यात आले होते, त्यामुळें साईबाबांची शिर्डी नगरी व परिसरात भीतीचे वातावरण तयार झाले होते, त्यानंतर काही तासातच शिर्डी पोलिसांनी आरोपींना अटक केली होती.

शिर्डी येथील दुहेरी हत्याकांडातील आरोपी नामे _ राजु उर्फ शाक्या अशोक माळी, वय २९ वर्षे, रा. गणेशवाडी, शिर्डी, ता. राहाता, जि. अहिल्यानगर, आरोपी नामे किरण ज्ञानदेव सदाफुले, वय २६ वर्षे, रा. श्रीरामनगर, शिर्डी, ता. राहाता, जि. अहिल्यानगर यांनी केला असल्याचे निष्पन्न झाले होते.

शिर्डी येथील दुहेरी हत्याकांडातील सदरील आरोींविरोधात शिर्डी पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर ५३/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम १०३(१), १२६, ३०९(६), ३११, ३१२, सह भारतीय हत्यार कायदा कलम ४, २५, सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९४९ चे कलम १४२ प्रमाणे गुन्हा दाखल होता.

नमुद दाखल गुन्हयास महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी अधिनियम १९९९ मधील वाढीव कलम लावण्याची परवानगी मिळणेबाबत प्रस्ताव मा. विशेष पोलीस महानिरीक्षक, नाशिक परिक्षेत्र, नाशिक यांना गुन्हयाचे तपास अधिकारी श्री. रणजित गलांडे, पोलीस निरीक्षक, शिडी पोलीस स्टेशन यांनी सादर केला होता.

त्याप्रमाणे मा. विशेष पोलीस महानिरीक्षक, नाशिक परिक्षेत्र नाशिक यांनी शिडी पोलीस स्टेशन, गुन्हा रजिस्टर नंबर ५३/२०२५भारतीय न्याय संहिता कलम १०३ (१), १२६, ३०९(६), ३९९, ३१२, सह भारतीय हत्यार कायदा कलम ४, २५, सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९४९ चे कलम १४२ या गुन्हयातील सदरील आरोींविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंध अधिनियम सन १९९९ चे कलम ३ (१) (i), ३(२) व ३ (४) असे वाढीव कलम लावण्याबाबत परवानगी दिलेली आहे. त्याप्रमाणे सदरचे गुन्हयास दिनांक ०६/०३/२०२५ रोजी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी अधिनियम १९९९ मधील वाढीव कलमानुसार कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी शिर्डी यांच्या कार्यालयातून मिळाली.