राहुरी मार्केट कमिटी निवडणुक प्रोग्राम सर्व सामान्य उमेदवाराला घातक =सुरेशराव लांबे पाटील.

राहुरी मार्केट कमिटी निवडणुक प्रोग्राम सर्व सामान्य उमेदवाराला घातक =सुरेशराव लांबे पाटील.

 राहुरी मार्केट कमिटी संचालक मंडळ निवडणुक सन २०२३-२८ या कालावधीसाठी होणारी निवडणुक प्रोग्राम चुकीचा असुन तो सर्वसामान्य उमेदवाराला घातक आहे यामंध्ये शेतकरी व सामान्य उमेदवार यांना या निवडणुकीतुन परावृत्त करण्याचा सरळ सरळ हेतु निवडणुक आयोग व प्रस्थापित पुढाऱ्यांसह सरकारचा आहे, विद्यमान सरकारने सर्व शेतकऱ्यांना मार्केट कमिटी निवडणुकीमध्ये मतदानाचा हक्क देण्यात येईल अशी वल्गना केली होती परंतु शेतकऱ्यांना निवडणुकीत निव्वळ उभा राहण्याचा अधिकार दिला त्यासाठी 5 हजार अनामत रक्कम,सोसायटी व ग्रामपंचायत सदस्य हे सुचक अनुमोदक लागतील अशी अट घालुन शेतकऱ्यांना उभा राहण्याचा अधिकार देऊन प्रचार कालावधी अल्प करून शेतकऱ्यांची एक प्रकारे शासनाने थट्टाच केली,हा प्रश्न आम्ही माजी मंत्री आ बच्चुभाऊ यांच्याकडे मांडणार असे मत प्रहार जनशक्ती पक्षाचे राहुरी तालुका अध्यक्ष सुरेशराव लांबे पाटील यांनी व्यक्त केले,

राहुरी मार्केट कमिटी संचालक मंडळ निवडणुक सन-2023 ते 2028 या कालावधीसाठी होणाऱ्या निवडणुक प्रोग्राम पुढील प्रमाणे,

*अर्ज भरणे दिनांक-27/3/ 2023/ ते 3/4/ 2023/ 8 दिवस त्यामध्ये 3 दिवस सुट्ट्या अर्ज भरण्यासाठी फक्त 5 दिवस,

*अर्ज छाननी-दिनांक-5/4/2023/ *अर्ज माघार दिनांक-6/4/2023/ते दिनांक-20/4/2023/अर्ज मागे घेण्यासाठी 15 दिवस मुदत आहे,

*चिन्ह वाटप दिनांक -21/4/2023/पासुन ते मतदान,दिनांक-28/4/2023/ पर्यत 8 दिवस आहेत,त्यातील चिन्हवाटपाचा दिवशी उमेदवाराला त्या दिवशी चिन्ह मिळते त्यानंतर उमेदवाराला मतदारापर्यंत जान्यासाठी आपले नाव अनुक्रम नंबर व चिन्ह ही ओळख पोहोचवण्यासाठी मत पत्रिका छपाई करणे आवश्यक आहे त्यामुळे तो दिवस व रात्र त्यातच जाते व निवडणुक आयोगाच्या नियमाप्रमाणे प्रचार मतदानाच्या आधी 1 दिवस बंद होतो त्यामुळे उमेदवारांना प्रचारासाठी फक्त 5 दिवस मिळतात,

अशा पध्दतीने अर्ज भरणे पासुन ते मतदान दिवसा पर्यत 33 दिवसाचा प्रोग्राम असुन यामंधे प्रचारासाठी फक्त 5 दिवस कालावधी मिळतो अशा एकुण परिस्थिती मंध्ये सर्व सामान्य शेतकरी वर्गातील उमेदवाराने सोसायटी मतदार संघातील 110 सोसायटीचे 1382 मतदार,व ग्रामपंचायत मतदार संघातील 83 गावातील 966 मतदारांन पर्यत आपले चिन्ह कसे पोहचवावे व प्रचार कसा करावा व मतदाराचे मतपरिवर्तन कसे करावे,तरी निवडणुक आयोग व निवडणुक अधिकारी यांनी प्रचारासाठी आणखी 15 दिवस मुदत वाढवावी ही विनंती,मुदत वाढ न मिळाल्यास सर्व सामान्य उमेदवाराचा प्रचारा अभावी पराभव झाल्यास आम्ही न्यायालयात जाणार, असे मत शेतकरी नेते लांबे यांनी व्यक्त करुन,

तरी सर्व सामान्य शेतकरी व सोसायटी,ग्रामपंचाय सदस्य यांनी या निवडणुकीत अर्ज भरण्यासाठी आवश्यक कागदपत्र जोडुन प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने आपला अर्ज भरावा व कष्टकरी शेतकऱ्यांची होणारी लुट थांबवावी असे आव्हान प्रहार जनशक्ती पक्षाचे राहुरी तालुका अध्यक्ष सुरेशराव लांबे पाटील यांनी व्यक्त केले.