पिंप्री अवघड येथे हजारो भाविकांनी घेतले श्री संत माधव महाराज यांचे दर्शन, महाराजांच्या उपस्थितीत एक दिवसीय पारायण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न .
राहुरी तालुक्यातील पिंप्री अवघड येथे एक दिवसीय पारायण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाचे आयोजन सर्व ग्रामस्थ पिंप्री अवघड,शंकर महाराज सेवेकरी वृंद,चिदंबर सेवा समिती सोनई ,ब्राह्मणी तसेच श्री शंकर महाराज मठ कासार गल्ली पाथर्डी यांनी केले होते.दिनांक १९ / 03 / 2022 रोजी एक दिवसीय पारायणाचे आयोजन करून यामध्ये श्री शंकर गीता व श्री माधव लीलामृत ग्रंथ पठण कार्यक्रम ,श्री माधव बाबा यांचे प्रवचन ,पारायणकर्त्यांना महाराजांच्या हस्ते शाल व श्रीफळरुपी आशीर्वाद,स्वामींची आरती व त्यानंतर महाप्रसाद अशी या कार्यक्रमाची रूपरेषा होती .
यामध्ये एकूण १५१ भाविकांनी ग्रंथ पारायणासाठी सहभाग घेतला होता,त्यात बहुसंख्य तरुण वर्ग , माता-भगिनी व कुमारिका यांचा सहभाग होता .ग्रंथ पठणाबरोबर श्री शिव चिदंबर नामजप व जय शंकर नामजप सतत चालू होता .
सोनई, ब्राह्मणी ,राहुरी पंचक्रोशीतील तसेच नेवासा , पारनेर ,औरंगाबाद येथीलभाविकांनी या कार्यक्रमामध्ये प्रत्यक्ष सहभाग घेऊन लाभ घेतला .या कार्यक्रमास श्री संत माधव बाबा शंकर महाराज मठ कासार गल्ली ( पाथर्डी )यांचे शुभ आशीर्वाद लाभले .परमपूज्य माधव बाबा यांनी भक्ती कशी करावी याबाबत प्रवचन केले. सत्य ,पथ्य आणि नियम यांची जोड भक्तीस दिली तर प्रत्येकास भगवंताची प्राप्ती झाल्याशिवाय राहत नाही.याबाबत दृढनिश्चय असावा लागतो असे बाबा वारंवार सांगत होते. तसेच आयुष्यातला प्रत्येक क्षण हा भगवंताच्या नामस्मरणात घालवला पाहिजे जेणेकरून या सद्यस्थितीतील कठीण काळात दैनंदिन दिनक्रम चालू ठेवण्यासाठी त्याचा सर्वाधिक फायदा होतो.बाबांच्या तेजोमय वाणीतुन येणाऱ्या प्रवचनरुपी शब्दांनी सर्व भाविक तृप्त झाल्याचे या ठिकाणी दिसत होते.
या कार्यक्रमासाठी हजारो भाविकांबरोबरच मा. डॉ. सौ .उषाताई तनपुरे यांनीही स्वतः उपस्थित राहून बाबांचे आशीर्वाद घेतले .आयोजकांनी सर्व उपस्थित भाविकांचे आभार मानले व शेवटी सर्व भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतल्यानंतर या कार्यक्रमाची सांगता झाली.