अहमदनगर शहरात वाडीया पार्क येथे ऍप्पल कंपनीच्या बनावट ॲक्सेसरीज विकणाऱ्या सहा दुकानावर स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई.
अहमदनगर प्रतिनिधी // संभाजी शिंदे
अहमदनगर शहरात ऍ़पल मोबाईलची बनावट ऍ़क्सेसरी विकणाऱ्या सहा दुकानावर छापे टाकुन 37,62,369/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त,
स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगरची कारवाई.
याबाबतचा सविस्तर वृत्तांत असा आहे की, दिनांक 14/03/2024 रोजी जी.आय.पी.एस.प्रा.लि. मुंबई या कंपनीचे मुख्य तपासी अधिकारी कुंदन गुलाबराव बेलोशे पुर्व कल्याण यांनी राकेश ओला पोलीस अधीक्षक, अहमदनगर यांना समक्ष भेटुन अहमदनगर शहरातील वाडीया पार्क कॉम्प्लेक्स अहमदनगर येथील मोबाईल दुकानामध्ये ऍ़पल कंपनीचे नावाचा वापर करुन ऍ़पल कंपनीचा लोगो असलेली बनावट ऍ़क्सेसरी विक्री होत असलेबाबत माहिती दिली.
त्यानुसार पोलीस अधीक्षक, अहमदनगर यांनी प्राप्त माहिती दिनेश आहेर, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांना कळवुन खात्री करुन कारवाई करण्या बाबत आदेश दिले.
नमुद आदेशा प्रमाणे पोनि/ दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोउपनि/तुषार धाकराव तसेच पोलीस अंमलदार संदीप पवार, मनोहर गोसावी, रविंद्र कर्डीले, संतोष खैरे, गणेश भिंगारदे, अतुल लोटके, विजय ठोंबरे, शिवाजी ढाकणे, रविंद्र घुंगासे, बाळासाहेब गुंजाळ, आकाश काळे, किशोर शिरसाठ, सागर ससाणे यांचे पथक तयार करुन जी.आय.पी.एस.प्रा.लि. कंपनीचे तज्ञ अधिकारी व पंचांना सोबत घेवुन वाडीया पार्क कॉम्प्लेक्समध्ये जावुन खात्री करुन कारवाई करणे बाबत सुचना देवुन पथकास तात्काळ रवाना केले.
पथकाने वाडीया पार्क कॉम्प्लेक्स मध्ये दिनांक 14/03/2024 रोजी सकाळी 11.30 वा. चे सुमारास जावुन खात्री करता सदर ठिकाणी माँ चामुण्डा मोबाईल कवर, ग्लास होलसेल विक्रेता या दुकानामध्ये 1) हिमताराम वालारामजी चौधरी वय 46 वर्षे, रा. ओम कॉलनी, नानाजी नगर, रामदेव बाबा मंदीराजवळ, औसरकरमळा, अहमदनगर हा 13,50,967/- रुपये किमतीचा, व्हाईस टेलिकॉम मोबाईल ऍ़क्सेसरीज या दुकानामध्ये
2) धनराज चंद्रकांत डेंगळे वय 38 वर्षे, रा. आनंदनगर, अहमदनगर, 3) रुपेश सुराण पुर्ण नांव माहित नाही. रा. लातुर, हल्ली रा. आनंदनगर, अहमदनगर (फरार) हे 14,82,900/- रुपये किमतीचा, शिवसहारा मोबाईल ऍ़क्सेसरीज, स्पेअर पार्ट, ऍ़ण्ड टुल्स होलसेल या दुकानामध्ये
4) संपत ममताजी पालवे वय 27 वर्षे, रा. मिरी, ता. पाथर्डी, जि. अहमदनगर हा 3,06,830/- रुपये किमतीचा मुद्देमाल, नवकार ऍ़क्सेसरीज मोबाईल रिपेअरींग ऍ़ण्ड ट्रेनिंग सेंटर या दुकानामध्ये इसम
5) साहिल विजय शिंदे वय 19 वर्षे, रा. ताराबाग कॉलनी, केडगांव, ता. जि. अहमदनगर,
6) शुभम शिवाजी तोगे वय 18 वर्षे ,रा. मिरी, ता. पाथर्डी, जि. अहमदनगर,
7) प्रतिक सुभाष गुगळे रा. मिरी ता. पाथर्डी, हल्ली रा. सारसनगर, अहमदनगर (फरार) हे 5,35,099/- रुपये किमतीचा, आनंद भक्ती मोबाईल ऍ़क्सेसरीज ऍ़ण्ड होलसेल्स या दुकानामध्ये
8) अजय रसिकलाल बाफना वय 47 वर्षे, रा. भवानीनगर, मार्केटयार्ड शेजारी, अहमदनगर हा 59,700/- रुपये किमतीचा, जय श्री कृष्ण मोबाईल होलसेल मोबाईल ऍ़क्सेसरीज या दुकानामध्ये
9) यश किशोर खत्ती वय 21 वर्षे, रा. पारशाखुंट, हलवाई गल्ली, अहमदनगर हा 26,900/- रुपये किमतीचा मुद्देमाल त्यांचेकडे ऍ़पल कंपनीकडील कोणत्याही प्रकारचा अधिकृत परवाना नसतांना Apple Inc. कंपनीचे लोगो चा वापर करुन बनावट चार्जर, केबल्स, एअरपॉड, मोबाईल कव्हर, बॅटरी, स्क्रिन गार्ड, ऍ़डॉप्टर, चार्जींग स्ट्रीप, सिम ट्रे, बॅक ग्लास पॅनल असे विक्री करण्याचे उद्देशाने वरील 06 दुकानामध्ये मिळुन आले आहेत.
ताब्यात घेण्यात आलेल्या 07 इसमांकडुन 37,62,369/- रुपये किमतीचा ऍ़पल कंपनीचा बनावट मुद्देमाल जप्त करुन त्यांचेविरुध्द कंपनीची मुख्य तपासी अधिकारी श्री कुंदन गुलाबराव बेलोशे यांचे फिर्यादीवरुन कोतवाली पोलीस स्टेशन गु.र.नं. 325/2024 प्रतिलिपी अधिकार अधि. 1957 (सुधारीत अधि. 1984 आणि 1994) कलम 51, 63 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास कोतवाली पोलीस स्टेशन करीत आहे.
सदर कारवाई राकेश ओला पोलीस अधीक्षक, अहमदनगर, प्रशांत खैरे , अपर पोलीस अधीक्षक, अहमदनगर व अमोल भारती , उपविभागीय पोलीस अधिकारी, नगर शहर विभाग यांचे सुचना व मार्गदर्शना खाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.
सदरच्या कारवाईने अहमदनगर जिल्ह्यात एकच खळबळ उडली असून चर्चेला उधाण आले आहे.