आठ वर्षीय बालिकेवर अत्याचार केल्या प्रकरणी आरोपीस २० वर्षे सक्त मजुरी व दंडाची शिक्षा ,

आठ वर्षीय बालिकेवर अत्याचार केल्या प्रकरणी आरोपीस २० वर्षे सक्त मजुरी व दंडाची शिक्षा ,

अहमदनगर : आरोपी नामे रशिद सरदार बेग , वय २८ वर्षे , रा . खोसपुरी ता . जि . अहमदनगर याने आठ वर्षीय बालिकेला मोबाईल खेळण्याच्या बहाण्याने त्याचे स्वत : चे घरी घेवून जावून तिचेवर शारीरिक अत्याचार केल्याप्रकरणी अहमदनगर येथील मा . माधुरी एच . मोरे मॅडम , अतिरिक्त व विशेष ( पोक्सो कोर्ट ) जिल्हा व सत्र न्यायाधीश यांनी दोषी धरून भा.दं.वि. कलम ३७६,३७६ ( २ ) ( आय ) ( जे ) , ३७६ ( ३ ) तसेच लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण करणारा कायदा २०१२ चे कलम ६ नुसार दोषी धरून आरोपीस २० वर्षे सक्त मजुरी व रूपये २,००० / - रूपये दंड व दंड न भरल्यास १ महिना साधी कैदेची शिक्षा सुनावली . सदर खटल्याचे कामकाज विशेष सरकारी वकील अॅड . मनिषा पी . केळगंद्रे - शिंदे यांनी पाहिले . घटनेची थोडक्यात हकीगत की , इयत्ता तिसरी मध्ये शिकणारी आठ वर्षीय चिमुरडी बालिका ही दिनांक २४.० ९ .२०२० रोजी तिच्या घरासमोरील ओटयावर खेळत होती . त्यावेळी आरोपी हा तेथे येवून तिला म्हणाला की , चल मोबाईल खेळायला " असे म्हणून तिच्या हाताला धरून त्याच्या घरी घेवून गेला . घरात गेल्यानंतर आरोपीने घराची कडी आतून लावून दरवाजा बंद केला . त्यानंतर आरोपीने मुलीच्या तोंडाला रुमाल बांधला व तिच्या दोन्ही कानात कापसाचे बोळे घातले . त्यानंतर आरोपीने तिचेवर शारिरीक अत्याचार केला . पिडीत मुलीने त्याला प्रतिबंध करण्याचा प्रयत्न केला परंतू आरोपीने तिला हाताला घट्ट धरून ठेवले होते . घरी आल्यानंतर पिडीत मुलीने घडलेली सर्व घटना तिच्या आईला सांगितली . त्यावेळी पिडीत मुलगी ही अत्यंत घाबरलेली होती . तसेच जोरा - जोरात रडत होती . तसेच तिच्या कपडयांवर डाग पडलेले होते . घडलेली सर्व परिस्थिती पाहता , पिडीत मुलीचे आईने एम.आय.डी.सी. पोलिसांना बोलावून घेतले . त्यानंतर पोलिसांसोबत जावून पोलिस स्टेशनला घटनेची फिर्याद दिली . घटनेचा संपूर्ण तपास पोलिस उप निरीक्षक विनोद जाधोर यांनी करून मा . न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले . या खटल्यामध्ये सरकार पक्षातर्फे एकूण १२ साक्षीदार तपासण्यात आले . यामध्ये अल्पवयीन पिडीत मुलगी , पिडीतेची आई , पंच साक्षीदार तपासी अधिकारी , वयासंदर्भात मुख्याध्यापक व महानगर पालिका व वैद्यकिय अधिकारी यांच्या साक्षी

नोंदविण्यात आल्या . सरकारी वकीलांनी युक्तीवाद केला की , सदरच्या घटनेमधील मुलगी ही केवळ आठ वर्षे वयाची आहे . घडलेल्या घटनेमुळे तिच्या मनावर अतिशय परिणाम झालेला आहे . तिचे मानसिक स्वास्थ्य बिघडलेले आहे . ती घराबाहेर पडायला तसेच इतर लोकांशी बोलण्यास धजावत नाही . तसेच घटनेचे गांभीर्य पाहता , छोटया चिमुरडीवर झालेली घटना ही समाज मनावर परिणाम करणारी आहे . समाजात वाढणारी विकृती पाहता या केसमध्ये आरोपीस जास्तीत जास्त शिक्षा होणे गरजेचे आहे , त्यामुळे अशा प्रकारच्या विकृती थांबविण्यासाठी तसेच अशा घटना पुन्हा घडणार नाहीत . अशा प्रकारच्या घटनांना आळा बसविणे ही प्रशासनासोबत कोर्टाची देखील जबाबदारी आहे . त्यामुळे या केसमध्ये आरोपीस जास्तीत जास्त शिक्षा दिली तर समाजातील विकृतींवर आळा बसेल व अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडून येणार नाहीत . सरकारी वकीलांनी केलेला युक्तीवाद व केस मध्ये झालेला पुरावा ग्राहय धरून आरोपीस मा . न्यायालयाने वरिल प्रमाणे शिक्षा ठोठावली . सदर खटल्याचे कामकाज विशेष सरकारी वकील अॅड . मनिषा पी . केळगंद्रे - शिंदे यांनी पाहिले . त्यांना पैरवी अधिकारी आडसुळ , तसेच पो . कॉ . भगवान वंजारे यांनी सहकार्य केले . 

अहमदनगर 

ता . १३/०२/२०२३ 

( अॅड . मनिषा पी . केळगंद्रे- शिंदे )

 विशेष सरकारी वकील , अहमदनगर .

 मो . ९ ८५०८६०४११,८२०८ ९९ ६७ ९ ५