लातूरमध्ये न्यायालयीन अर्ज फेटाळला; कर्मचाऱ्यांच्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह

लातूरमध्ये न्यायालयीन अर्ज फेटाळला; कर्मचाऱ्यांच्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह

लातूरमध्ये न्यायालयीन अर्ज फेटाळला; कर्मचाऱ्यांच्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह

प्रतिनिधी // प्रसाद घोगरे // 9370328944.

मुख्य न्यायिक दंडाधिकारी न्यायालय, लातूर येथील प्रकरण चर्चेत

लातूर, प्रतिनिधी : लातूर येथील मुख्य न्यायिक दंडाधिकारी न्यायालय (न्यायालय क्र. ६) येथे दाखल करण्यात आलेल्या एका फौजदारी अर्जावर दिलेल्या आदेशामुळे न्यायालयीन प्रक्रियेतील प्रशासकीय कार्यपद्धतीबाबत चर्चा सुरू झाली आहे. अर्जदार प्राशांत अशोकराव वडगावे यांनी न्यायालयीन कर्मचाऱ्यांकडून अर्ज न्यायालयासमोर सादर न केल्याचा आरोप करत पोलीस तपासाच्या निर्देशासाठी अर्ज दाखल केला होता.

अर्जदाराच्या निवेदनानुसार, ३० ऑगस्ट २०२४ रोजी साक्षीदार व कागदपत्र मागविण्यासंदर्भात दोन अर्ज ई-फायलिंगद्वारे तसेच प्रत्यक्ष स्वरूपात सादर करण्यात आले होते. मात्र संबंधित अर्ज न्यायालयासमोर ठेवण्यात आले नाहीत, तसेच त्यानंतर दाखल केलेल्या पुर्सिसवरही कोणतीही कार्यवाही झालेली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकारामुळे न्यायनिवाड्याच्या प्रक्रियेत अडथळा निर्माण झाल्याचे अर्जदाराचे म्हणणे आहे.


या संदर्भात अर्जदाराने जिल्हा न्यायाधीश तसेच पोलिसांकडे तक्रारी दिल्याचे नमूद करण्यात आले होते. मात्र पोलिसांकडून गुन्हा नोंदविण्यात न आल्याने त्यांनी न्यायालयाकडे दखल घेण्याची मागणी केली होती.

सदर प्रकरणात न्यायालयाने नमूद केले की, तपासाचे निर्देश देण्यासाठी दाखल करण्यात आलेला अर्ज आवश्यक शपथपत्राविना सादर करण्यात आला असल्याने तो कायद्याच्या दृष्टीने ग्राह्य धरता येत नाही. तसेच मांडण्यात आलेल्या आरोपांवरून प्रथमदर्शनी संज्ञेय गुन्हा उघड होत नसल्याचे निरीक्षण नोंदवून अर्ज फेटाळण्यात आला.