*मोसंबी,आंबा,डाळींब,पेरू, किड/ रोग प्रादुर्भावग्रस्त बागांना म.फु.कृ.वि.राहुरीच्या शास्त्रज्ञ शेतकरऱ्यांच्या बांधावर भेटी.*

*मोसंबी,आंबा,डाळींब,पेरू, किड/ रोग प्रादुर्भावग्रस्त बागांना म.फु.कृ.वि.राहुरीच्या शास्त्रज्ञ शेतकरऱ्यांच्या बांधावर भेटी.*

दिनांक. १८.११.२०२६ रोजी मौजे नांदूरविहिरे व निंबे ता. शेवगाव जिल्हा. अहिल्यानगर येथील मोसंबी, आंबा, डाळिंब फळबागांना भेट देऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

यावेळी राहुरी कृषि विद्यापीठातील शास्त्रज्ञ प्रा. मधुकर शेटे, सहाय्यक प्राध्यापक, अखिल भारतीय समन्वित फळ पिके संशोधन प्रकल्प), डॉ. प्रवीण खैरे (संशोधन सहयोगी, हॉर्टसॅप प्रकल्प), श्री अजिनाथ गोरक्ष दगडखैर सहाय्यक कृषी अधिकारी नांदूर विहीरे व शेतकरी उपस्थित होते. मोसंबी, आंबा, डाळिंब पिकावरील कीड व रोग व्यवस्थापन, मार्केट तंत्रज्ञान, भविष्यातील पीक पद्धती, मोसंबी, आंबा, डाळिंब पिकावरील समस्या व त्यावरील उपाय, काढणी पश्चात तंत्रज्ञान यावर प्रा. शेटे व डॉ. खैरे यांनी शेतकऱ्यांसोबत सविस्तर चर्चा केली व किड रोग व्यवस्थापन घडी पत्रिकांचे वाटप केले. या भेटीसाठी डॉ. संजय कोळसे (प्रभारी हॉर्टसॅप प्रकल्प व विभाग प्रमुख) डॉ. सुदर्शन लटके (प्रकल्प समन्वयक तथा सहयोगी प्राध्यापक), वनस्पती रोगशास्त्र व अनुजीवशास्त्र विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी यांचे मार्गदर्शन लाभले.