*संविधान दिन २६ नोव्हेंबर २०२२ मोठ्या उत्साहाने साजरा.*
*संविधान दिन २६ नोव्हेंबर २०२२ मोठ्या उत्साहाने साजरा.*
श्रीरामपूर:- दि. २६/११/२०२२ संविधान दिनानिमित्त शहरात विविध ठिकाणी संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा केला. जसे कॅथोलिक मराठी शाळा, टिळकनगर-शाळेचे मॅनेजर फा. मायकल वाघमारे, मा. मुख्याध्यापक, श्री. उबाळे सर, शाळेतील सर्व शिक्षकवृंद यांनी संविधान पुस्तकप्रत व डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतीमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.ग्रामपंचायत दत्तनगर येथे संविधान दिन साजरा करत असता श्री. बाबासाहेब दिघे ( जिल्हा परिषद सदस्य) , श्री. सुनिलभाऊ शिरसाठ ( सरपंच दत्तनगर) सौ. मिनाक्षीताई सुनिल जगताप, श्री. प्रेमचंद कुंकलोळ आणि सर्व ग्रामपंचायत सदस्य दत्तनगर, सर्व आशा सेविका, सर्व अंगणवाडी सेविका, ग्रामपंचायत कार्यालय कर्मचारी वर्ग यांनी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा व संविधान प्रतिस पुष्पहार अर्पण करुन, संविधानाची उद्देशिका ( preamble ) वाचतांना उजवा हात पुढे करुन संविधान दिनी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. तसेच शासकिय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, श्रीरामपूर येथे संविधान दिन साजरा करतांना सुनिलभाऊ शिरसाठ सरपंच व बाबासाहेब दिघेसाहेब, दत्तनगर ग्रामपंचायत सदस्य, संस्थेतील कर्मचारी, शिल्प निदेशक व विद्यार्थी उपस्थित होते. संविधाना बाबतचे महत्व व आदर. डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाबत श्री. पालवे सर यांनी माहिती दिली तर सकाळी टिळकनगर येथील चौकातील व श्रीरामपूर येथील रेल्वे स्टेशन समोरील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास मोठ्या उत्साहाने पुष्पहार अर्पण करून अभिवादन करतांना, संविधानाचा व डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आदर व सन्मान करणारे श्रीरामपूर शहरातील नागरीक दिसत होते. एकंदरीत सर्व श्रीरामपूर तालुक्यात संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा केला गेला.----- रिपोर्टर बी पी एस लाईव्ह न्यूज निकाळे प्रकाश.
I am a retired as Craft Instructor from Govt. I. T. I. Shrirampur, state government Employed. Now Reporter of BPS Live news Shrirampur, Ahmednagar, Maharashtra since Dec. 2021.