जिल्हा परिषद खेडले परमानंद शाळेतील लहान मुलांच्या भौतिक असुविधेबाबत संभाजी शिंदे यांच्या उपोषणाला यश,शासनाकडून लेखी पत्र.

जिल्हा परिषद खेडले परमानंद शाळेतील लहान मुलांच्या भौतिक असुविधेबाबत संभाजी शिंदे यांच्या उपोषणाला यश,शासनाकडून लेखी पत्र.

नेवासा :- (प्रतिनिधी युनूस पठाण)जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खेडले परमानंद येथील भौतिक असुविदेबद्दल संभाजी शिंदे यांनी सुरू केलेले उपोषण आज पूर्ण झाले.

लवकरच जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या असूविधेबद्दल ज्या त्रुटी आहे त्या पूर्ण करण्यात येतील असे लेखी आश्वासन दिल्यानंतर पत्रकार संभाजी शिंदे यांनी आपले उपोषण सोडले.

     यावेळी गटविकास अधिकारी प्रदीप शेंडगे,सहाय्यक गटविकास अधिकारी सुरेश पाटेकर,डेप्युटी इंजिनियर कर्डिले,यांच्यासह नाईक सर सोनई पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र थोरात कॉन्स्टेबल दहिफळे ,राख,अडकिते ,ठोंबरे यांच्यासह सर्व ग्रामस्थ व महिला भगिनी मोठ्या संख्येने संख्येने उपस्थित होते.

        सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ वैद्यकीय सेवा पुरवण्यासाठी रुग्णवाहिका पाठवली.आरोग्य विभागाच्या भुसारी सिस्टर,व पाटोळे यांनी घटनास्थळी वेळोवेळी तपासणी करून उपोषणकर्त्याला वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून दिल्या,आशा वर्कर योगिता शिंदे यांनी वेळोवेळी उपोषणकर्त्याची सर्व माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिली.

      या उपोषणासाठी ग्रामस्थांनी संपूर्ण पाठिंबा दिल्यामुळे सदरचे उपोषण पूर्णत्वास गेले असे वक्तव्य आभार व्यक्त करताना संभाजी शिंदे यांनी सांगितले.

           या उपोषणाला सर्व गावाने पाठिंबा दिल्यामुळे हे उपोषण यशस्वी झाले.