नेवासा तालुक्यातील बेलपिंपळगाव येथील सरपंच यांना धमकीच्या पत्राबाबत सरपंच संघटना आक्रमक.
मस्साजोग व बेलपिंपळगाव घटने बाबत नेवासा सरपंच संघटना आक्रमक
बालाजी देडगाव ( प्रतिनिधी युनूस पठाण ) :- सरपंच संतोष देशमुख खुनातील व सरपंच कृष्णा शिंदे यांना धमकी देणाऱ्या आरोपीना कडक शिक्षा करावी यामागणीचे निवेदन तहसीलदार नेवासा यांना दिल्याचे व २ जानेवारी २०२५ गुरुवार रोजी तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत बंद ठेऊन निषेध करणार असल्याचे लोकसेवक सरपंच संघटना नेवासा तालुका अध्यक्ष सरपंच शरदराव आरगडे यांनी सांगितले
दिलेल्या निवेदनात संघटनेने म्हंटले आहे की सरपंच संतोष देशमुख यांचा खून हा गेल्या काही दशकातील महाराष्ट्रातला सर्वाधिक निर्घृण खुन आहे जल्लादांना ही पाझरफुटावा राक्षसाचा ही आत्मा थरथर कापावा इतक्या पाशवीपणे सरपंचाला मारले गेले आहे सदर घटनेतील चार आरोपी पकडले गेलेले आहे परंतु मुख्य आरोपी अद्याप मोकाट फिरत आहे त्यास अटक करून सर्वांना फाशीची शिक्षा दिली पाहिजे
तसेच नेवासा तालुक्यातील बिलपिंपळगाव चे सरपंच कृष्णा शिंदे यांना निनावी पोस्टाने संतोष देशमुख यांचे सारखे तुकडे करू अशी धमकी देण्यात आलेली आहे याबाबत पोलीस प्रशासनाने संतोष देशमुख प्रमाणे गुन्हा दाखल करायला विलंब न करता तातडीने कारवाई करावी अन्यथा सरपंच संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल तसेच सदर दोन्ही घटनेचा निषेध म्हणून गुरुवार दिनांक 2 /1 /2025 रोजी नेवासा तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतचे काम बंद ठेवून निषेध करणार आहे.
या संदर्भात तहसीलदार संजय बिरादार यांनी पोलिस निरीक्षक धनंजय जाधव यांना सदर घटनेची गांभीर्याने दखल घेऊन संबंधितांवर कारवाई करण्याचे सांगितले आहे
निवेदनावर संघटना अध्यक्ष शरदराव आरगडे वडुलेचे सरपंच मार्गदर्शक दिनकरराव गर्जे, कौठा सरपंच उपाध्यक्ष प्रमोद गजभार, हंडीनिमगाव सरपंच महिला आघाडी अध्यक्ष पुजाताई भिवाजी आघाव, देडगाव सरपंच चंद्रकांत मुंगसे, सुरेशनगर सरपंच शांताबाई उभेदळ, नजिक चिंचोली सरपंच वनमाला चावरे, चिलेखनवाडी सरपंच भाऊसाहेब सावंत, बाभुळखेडा सरपंच ज्ञानेश्वर औताडे, वंजारवाडी सरपंच सुनंदा दराडे आदीच्या सह्या आहेत