सावित्रीबाई फुले विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी घेतली शपथ, पतंग उडवतांना नायलॉन मांजा वापरणार नाही आणि कुणाला वापरू देणार नाही .

सावित्रीबाई फुले विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी घेतली शपथ, पतंग उडवतांना नायलॉन मांजा वापरणार नाही आणि कुणाला वापरू देणार नाही .

सावित्रीबाई फुले विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी घेतली शपथ, पतंग उडवतांना नायलॉन मांजा वापरणार नाही आणि कुणाला वापरू देणार नाही .

 

            सद्ध्या मकरसंक्रांत सणानिमित्त सर्वत्र पतंग उडवण्याचा आनंद घेतांना आपण पाहत असलो तरी पतंगासाठी वापरण्यात येणाऱ्या नायलॉन मांजामुळे कित्येक अपघात झाले असून काही जणांना जीवही गमवावा लागला आहे . पतंग उडवतांना तसेच नायलॉन मांजा वापरण्याने होणारे दुष्परिणाम याची जाणीव मुलांमध्ये होण्यासाठी सावित्रीबाई फुले माध्य व उच्च माध्यमिक विद्यालयात विशेष अभियान राबविण्यात आले असून या अभियानाअंतर्गत विद्यार्थ्यांनी शपथ घेतली की,आम्ही पतंग उडवताना आमच्या व इतर नागरिकांच्या सुरक्षेची काळजी घेवु. आम्ही पतंग उडवल्यास आमचा तसेच इतर कुणाचा ही अपघात होणार नाही याची खबरदारी घेवु.तसेच पतांगासाठी आम्ही नायलॉन मांजा वापरणार नाही, इतरानाही वापरू देणार नाही. तसेच कुणी नायलॉन मांजा वापरत असल्यास त्याची माहिती वडीलधाऱ्या मंडळींना, गावातील पोलीस पाटील यांना, तसेच वर्ग शिक्षक यांना माहिती देवू.संक्रात निमित्त विद्यार्थी पतंग उडवतात परंतु पतंग उडवत असताना नायलॉन मांजा वापरून अनेक अपघात होताना आपण ऐकतो .

 

             याबाबत शिक्षण विभागाचे गटशिक्षणाधिकारी मोहनीराज तुंबारे व पोलीस निरीक्षक संजय ठेंगे ( पोलीस स्टेशन राहुरी )यांच्या संकल्पनेतून तालुक्यातील सर्व शाळा व विद्यालयात जनजागृती करण्यात आली अभियानाचाच एक भाग म्हणून कृषी विद्यापीठातील सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालय कृषी विद्यापीठ राहुरी येथे हा उपक्रम राबवण्यात आला नायलॉन मांजा वापरण्याने होणारे दुष्परिणाम याची सविस्तर माहिती विद्यालयाचे प्राचार्य अरुण तुपविहीरे सर यांनी दिली याबाबतची शपथ क्रीडाशिक्षक घनश्याम सानप यांनी दिली .

 

         या अभियानामध्ये विद्यालयाचे उपमुख्यध्यापक बाळासाहेब डोंगरे, पर्यवेक्षक मनोज बावा ,तुकाराम जाधव ,संतोष जाधव, हलीम शेख ,संदीप कुंभारे तसेच सुरेखा आढाव, संगीता नलगे ,सविता गव्हाणे, मोनाली म्हसे ,या सर्वांनी हा उपक्रम यशस्वीपणे राबवण्यासाठी सहाय्य केले.