भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेअंतर्गत 62 लाख निधी मंजूर: नामदार तनपुरे यांचे सामाजिक न्याय विभागाकडून स्वागत.
बालाजी देडगाव ( प्रतिनिधी)भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजने अंतर्गत भरघोस निधी मंजूर केल्याबद्दल ना.तनपुरे यांचे राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाच्या वतीने अभिनंदन करण्यात आले!
राष्ट्रवादी कॉंग्रेस सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष अभिजित ससाणे म्हटले की,
महाराष्ट्र सरकारचे युवा कर्तबगार मंत्री नामदार प्राजक्त तनपुरे यांनी नेहमीच समतेचे राजकारण केले आहे, सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून त्याच्या जीवनात सर्वांगीण परिवर्तन घडवून आणण्यासाठी ना.प्राजक्त तनपुरे नेहमीच दक्ष असतात.
राहुरी नगर पाथर्डी मतदारसंघात अनुसूचित जाती व जमातींच्या मतदारांची संख्या निर्णायक आहे,त्यामुळे या समाज्याकडे ते जातीने लक्ष घालतात ,याचाच एक भाग म्हणून सामाजिक न्याय खात्याच्या माध्यमातून भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजने अंतर्गत 62 लाखांचा निधी मिळवून त्यांनी जिल्ह्यात निधीच्या बाबतीत अग्रक्रम घेतलेला आहे!
अनुसूचित जातीच्या हिताच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक कामासाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल ना.प्राजक्त दादा तनपुरे यांचे राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष मा.अभिजित ससाणे,पाथर्डी तालुका अध्यक्ष अंबादास शिंदे राहुरी शहराध्यक्ष दीपक साळवे,दीपक राम साळवे,बाबासाहेब साळवे,नगर तालुका अध्यक्ष अमोल शिंदे,प्रदीप ससाणे,सुधाकर शेरकर यासह अनेक कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले!!