शिरेगाव येथे आईने दिले मुलाला पुनर्जीवन.

शिरेगाव येथे आईने दिले मुलाला पुनर्जीवन.

आईने दिले मुलाला पुनर्जीवन

आई ती आईच असते आईला उपमाच नाही, अशीच एक घटना शिरेगाव ,तालुका नेवासा या ठिकाणी घडली आहे. बाळासाहेब बोरुडे नामक विवाहित तरुणाला आईने पुनर्जीवन दिले.

           कृष्णा यांच्या दोन्ही किडन्या अचानक निकामी झाल्यामुळे त्यांच्या कुटुंबावर शोककळा पसरली वयाच्या 28 व्या वर्षी किडन्या निकामी झाल्यामुळे संपूर्ण कुटुंब चिंताग्रस्त झाले .

डायलिसिस करून अशी तशी दोन वर्षे काढली परंतु त्यांची प्रकृती खालावत चालली व कुठलाही पर्याय नसल्याकारणाने शेवटी आईनेच पुढाकार घेतला व आपल्या मुलाला किडनी देऊन पुनर्जीवन दिले.

      लिलाबाई विश्‍वनाथ बोरुडे असे या मातोश्रीचे नाव असून आपल्या मुलाला किडनी देऊन त्यांनी त्याला पुनर्जीवन दिले. आज बाळासाहेब उर्फ कृष्णा बोरुडे यांचा वाढदिवस आहे. आईने दिलेल्या किडनी मुळे त्यांची प्रकृती स्थिर असून उत्तम प्रकारे ते जीवन जगत आहेत धन्य धन्य त्या मातेचे उपकार.

       कृष्णा बोरुडे यांचे एकत्रित कुटुंब असून त्यांचे मोठे बंधू पांडुरंग विश्वनाथ बोरुडे यांनी एखाद्या मित्राप्रमाणे आपल्या भावाची सेवा करून त्यांच्या उपचारासाठी आटोकाट प्रयत्न के

ले.