दहशतवादी व पाकिस्तानी स्पाय प्रकरणातील आरोपी बंटी जहागीरदाचां गोळीबारात मृत्य; श्रीरामपूर हादरलं..

दहशतवादी व पाकिस्तानी स्पाय प्रकरणातील आरोपी बंटी जहागीरदाचां गोळीबारात मृत्य; श्रीरामपूर हादरलं..

दहशतवादी व पाकिस्तानी स्पाय प्रकरणातील आरोपी बंटी जहागीरदाचां गोळीबारात मृत्य; श्रीरामपूर हादरलं.


प्रतिनिधी _ प्रसाद घोगरे - 9370328944.

पाकिस्तानी हेराला मदत केल्याच्या गंभीर आरोपांखाली अटक झालेला व पुणे बॉम्बस्फोट प्रकरणाशी संबंधित असलेला बंटी उर्फ असलम जहागीरदार याच्यावर अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथे दिवसाढवळ्या बेधुंद गोळीबार करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. या गोळीबारात बंटी जहागीरदार गंभीर जखमी झाला असून, त्याला तातडीने कामगार रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परिस्थिती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी त्याला अहिल्यानगर येथे हलविण्यात आले असून, तेथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले आहे.

कोण होता बंटी जहागीरदार?
बंटी उर्फ असलम जहागीरदार याला ऑगस्ट 2013 मध्ये नाशिकजवळील मनमाड येथे अटक करण्यात आली होती. त्याच्यावर पाकिस्तानी गुप्तहेर आरिफ लखानी याला मदत केल्याचा गंभीर आरोप होता. आरिफ लखानी याला मनमाड रेल्वे स्थानकावर गोवा एक्सप्रेसने प्रवास करत असताना अटक करण्यात आली होती.
पोलीस तपासादरम्यान लखानीने चौकशीत बंटी जहागीरदारचे नाव उघड केल्यानंतर बंटीला अटक करण्यात आली होती.

बंटीवर कोणते आरोप होते?
बंटी जहागीरदारवर - पाकिस्तानी गुप्तहेराला मदत करणे, देशविरोधी कारवायांमध्ये सहभाग, दहशतवादी नेटवर्कशी संबंध, संवेदनशील माहिती पुरवल्याचा संशय
असे गंभीर आरोप होते.

या प्रकरणात विविध केंद्रीय गुप्तचर संस्था, तसेच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी चौकशी केली होती. यावेळी 76 वर्षीय निवृत्त लष्करी जवानासह इतर काही जणांचीही चौकशी करण्यात आली होती.

कोर्टाने कोणत्या आधारावर दिली होती सुटका?
बंटी जहागीरदारला सुरुवातीला पोलीस कोठडी देण्यात आली होती. मात्र, तपासादरम्यान थेट ठोस पुरावे नसणे, परिस्थितीजन्य पुराव्यांवर आधारित आरोप आणि दीर्घ काळ चाललेला तपास या कारणांवरून त्याला नंतर न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला होता.

कसा झाला गोळीबार?
प्राथमिक माहितीनुसार, श्रीरामपूर येथील जर्मन हॉस्पिटल परिसरात, बंटी जहागीरदार दुचाकीवरून येत असताना दबा धरून बसलेल्या हल्लेखोरांनी त्याच्यावर गोळीबार केला.
सुमारे 7 गोळ्या झाडल्याची शक्यता वर्तवली जात आहे. घटनास्थळावरून रिकामे काडतूस जप्त करण्यात आले आहेत.
पोलीस तपासात हा हल्ला पूर्वनियोजित असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असून, पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

पोलिस तपास..
घटनास्थळी पंचनामा, सीसीटीव्ही फुटेज तपासणी,
श्रीरामपूरसह संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यात नाकाबंदी, संशयित वाहनांची कसून तपासणी, स्थानिक गुन्हे शाखेचा समांतर तपास, हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी पोलीस पथके रवाना करण्यात आली असून, या गोळीबारामागे जुन्या दहशतवादी प्रकरणाशी संबंधित वैर, अंतर्गत टोळी संघर्ष किंवा सूड या शक्यतांचा तपास केला जात आहे.