पंजाब पोलिसांना अनेक दिवसांपासून चकमा देत असलेला सराईत गुन्हेगार शेवटी महाराष्ट्र पोलीस स्था. गुन्हे शाखेच्या पथकाने मोठ्या शिताफीने पकडला.

पंजाब पोलिसांना अनेक दिवसांपासून चकमा देत असलेला सराईत गुन्हेगार शेवटी महाराष्ट्र पोलीस स्था. गुन्हे शाखेच्या पथकाने मोठ्या शिताफीने पकडला.

प्रतिनिधी संभाजी शिंदे खेडले परमानंद , नेवासा

पंजाब राज्यातील जालंदर या शहरातील एक सराईत गुन्हेगार जो जालंदर पोलिसांना वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये

 पाहिजे होता. या आरोपीचे नाव पुनीत उर्फ पिम्पु बळराज सोनी

असे आहे.

             हा आरोपी इतका चतूर आणि चलाख होता की हा स्वतःचे अस्तित्व लपून वेगवेगळे रूप बदलून वेगवेगळ्या ठिकाणी पोलिसांना चकमा देत अनेक 

दिवसांपासून फिरत होता.

            त्याच्यावर भादवि कलम 307, 148, 149 सह आर्म एक्ट 25 प्रमाणे गुन्हा दाखल आहे. खूप दिवसापासून जालंदर( पंजाब राज्य )पोलीस या आरोपीच्या शोधात होते.

        जालंदर गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक इंद्रजीत सिंह यांनी पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्याशी पत्रव्यवहार करून या गुन्ह्यात फरार असलेल्या आरोपी संदर्भात माहिती पुरवली व आरोपीचा तपास करून कारवाई करण्याची विनंती केली.

         त्यानुसार पोलीस महासंचालक मुंबई यांनी पोलीस अधीक्षक अहमदनगर मनोज पाटील यांच्याशी संबंधित गुन्ह्यात फरार असलेल्या आरोपीचा तपास करून कारवाई करण्यास संबंधीचे आदेश दिले.

         या आदेशान्वये पोलीस अधीक्षक अहमदनगर मनोज पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना गुन्ह्याचा तपास करण्याबाबत सूचना व मार्गदर्शन केले.

              गुन्ह्याची परिस्थिती लक्षात घेऊन कर्तव्यदक्ष व तत्पर पोलीस निरीक्षक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांनी पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे दोन पथके नियुक्त केले. यामध्ये पोलीस निरीक्षक दिनकर मुंडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ दिवटे, सहाय्यक फौजदार राजेंद्र वाघ, संजय खंडागळे, पोलीस हेडकॉन्स्टेबल बापूसाहेब फोलाने,

संदीप घोडके, दत्ता हिंगडे, विजय वेटकर, संदीप पवार, पोलीस नाईक भिमराज खर्से,संतोष लोंढे, सचिन अडबल, संदीप दरंदले,शंकर चौधरी, राहुल सोळुंके, रवी सोनटक्के, पोलीस कॉन्स्टेबल सागर ससाने, शिवाजी ढाकणे, रंजीत जाधव, चालक हेडकॉन्स्टेबल बबन बेरड, अर्जुन बर्डे अशा या सर्वांच्या मिळून पथकाने, आरोपीचा शोध घेत असताना गुप्त खबऱ्या कडून माहिती मिळाली व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलीस निरीक्षक कटके यांनी दोन विशेष पथकांना सोबत घेऊन शिर्डी परिसरातील तब्बल 133 हॉटेलांची तपासणी केली.आणि याच तपासणीदरम्यान हॉटेल निर्मळ इन लॉज मध्ये तपासणी करत असताना जालंदर पोलिसांकडून प्राप्त झालेल्या माहिती पत्रिकेप्रमाणे वर्णन असलेल्या इसम निदर्शनात आला.

         पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले व कसून चौकशी केली. महाराष्ट्र पोलिसांनी त्यांचा महाराष्ट्रीयन पोलिसी खाक्या दाखवला व आरोपी पोपटासारखा बोलू लागला. त्याने त्याचे खरे नाव पुनीत उर्फ पिंम्पु 

बलराज सोनी, वय 27 राहणार शहीद बाबूलाल सिंग नगर जालंधर पंजाब असल्याचे सांगितले.

         जालंदर पोलिसांकडून प्राप्त कागदपत्रांच्या आधारे त्यांना हवा असलेला आरोपी हाच असल्याचे स्थानिक गुन्हे शाखेने निष्पन्न झालेने त्यास पुढील कारवाईसाठी जालंदर पोलीस पंजाब यांना ताब्यात घेण्याबाबत कळवले.

         जालंदर पोलिसांनी माहिती दिली की सदर आरोपी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर दोन गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत व तात्काळ त्यांनी पंजाब पोलिसांचे पथक आरोपीला ताब्यात घेण्यासाठी शिर्डी याठिकाणी पाठवले, पुढील कारवाईसाठी हे पथक सदर आरोपी घेऊन (पंजाब राज्य) जालंदर रवाना झाले.

            सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अहमदनगर मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर स्वाती भोर , उपविभागीय पोलिस अधिकारी संजय सातव यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व अंमलदार यांनी केली.