श्रीराम विद्यालय ढोरजळगाव येथे क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन.
श्रीराम विद्यालय ढोरजळगाव येते क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना अभिवादन.
भारत भालेराव
तालुका प्रतिनिधी, शेवगाव
शेवगाव: दि.28 ढोरजळगाव येथील श्रीराम माध्य व उच्च माध्यमिक विद्यालयात स्त्री शिक्षणाचे प्रणेते, थोर समाजसुधारक, सत्यशोधक समाजाचे संस्थापक, क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना 133 व्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांचा हस्ते करण्यात आले.
विद्यालयातील विद्यार्थिनी कु.फसले श्रेया,देशमुख सृष्टी यांनी मनोगत व्यक्त केले विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक शंकर खोले व पांडुरंग व्यवहारे यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांचे बालपण,शिक्षण आणि कार्य या विषयावर आपले मनोगत व्यक्त केले.
विद्यालयातील शिक्षक सुरेश भापकर यांनी पेशवाईच्या काळात स्त्रियांची परिस्थिती आणि या परिस्थितीत महात्मा फुले यांनी स्त्रियांना शिक्षण मिळावे म्हणून केलेलं उल्लेखनीय कार्य आणि या कार्यातला सावित्रीबाई फुले यांचा सहभाग,सत्यशोधक समाजाची स्थापना आणि फुलेंनी निर्माण केलेले साहित्य याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.विद्यालयाचे प्राचार्य संजय चेमटे यांनी फुलेंच्या काळातील स्त्री आणि तिच्यावर लादलेल्या केशवपन,सती जाणे अश्या अनिष्ट प्रथा आणि शिक्षणामुळे स्त्रियांच्या जीवनात झालेला बदल आपल्या मनोगतातून सांगितला.कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे पर्यवेक्षक सुनील जायभाये यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात स्वातंत्र्य पूर्व काळात असणारे अज्ञान आणि त्यातून पुढे आलेल्या अनिष्ट प्रथा आणि परंपरा तसेच फुलेंनी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाची गरज आणि स्त्रियांना मिळालेल्या शिक्षणामुळे आज शिक्षण आणि इतर प्रत्येक क्षेत्रात स्त्रिया बजावत असलेल्या महत्वाच्या भूमिका हे सर्व फक्त महात्मा फुले यांनी केलेल्या कार्यामुळे घडले आहे आणि आपण याची जाणीव ठेवून स्त्रियांचा सन्मान करून त्यांना समान संधी देणे गरजेचे आहे असे मत मांडले.कार्यक्रमासाठी विद्यालयाचे प्राचार्य संजय चेमटे,पर्यवेक्षक सुनील जायभाये,संस्था प्रतिनिधी सुरेश तेलोरे,रामदास गायकवाड,भागचंद मगर,पांडुरंग व्यवहारे,शंकर खोले, सुधाकर आल्हाट,कल्याण राऊत, ईश्वर वाबळे,सविता सातपुते, रत्नमाला फलके,विमल पवार,स्वाती वाहुरवाघ,यांचेसह शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सुत्रसंचालन श्रीम.पूनम वाबळे यांनी केले तर राहुल दहातोंडे यांनी उपस्थितांचे आभार मानले.