शेतात कामावर येण्यास नकार दिल्याने आदिवासी मुलासह त्याच्या इतर नातेवाईकांना जबर मारहाण,आरोपींवर गुन्हा दाखल.

शेतात कामावर येण्यास नकार दिल्याने आदिवासी मुलासह त्याच्या इतर नातेवाईकांना जबर मारहाण,आरोपींवर गुन्हा दाखल.

शेतात कामावर येण्यास नकार दिल्याने आदिवासी मुलासह त्याच्या इतर नातेवाईकांना जबर मारहाण करण्यात आली आहे .

 

         

                वैजापूर तालुक्यातील गोळवाडी येथील 17 वर्षीय अनिकेत ज्ञानेश्वर सोनवणे या आदिवासी तरुणास शेतात कामावर येण्यास नकार दिला म्हणून त्यास व त्याच्या नातेवाईकास वीळा,काठीव लाथाने जबरदस्त मारहाण करून जखमी करण्यात आले आहे .आपल्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी व गुन्हेगारांना शिक्षा व्हावी यासाठी त्यांनी तात्काळ पोलीस स्टेशन गाठून फिर्याद दिली आहे .या फिर्यादीत त्यांनी म्हटले आहे की मी, अनिकेत ज्ञानेश्वर सोनवणे वय 17 वर्ष व्यवसाय शेती रा.गोळवाडी ता. वैजापूर जि. संभाजीनगर येथे राहणारा असुन शेती व्यवसाय करून पोट भरतो व वरील ठिकाणी आई-वडिलांसह राहतो .

               दिनांक. 16/08/2023 रोजी सकाळी 07.00 वा चे सुमारास मी माझे राहते घरी गोळवाडी येथे असतांना मला आमचे गावातील महेश संजय त्रिभुवन याने माझे मो.नं. 9511884192 यावर कॉल करुन बाबासाहेब शिंदे यांचे शेतातील मक्काला युरिया टाकायचे कामाला ये. असे म्हणाला पण मला दुसरे काम असल्याने मी कामाला यायला नकार दिला होता. त्यानंतर सायंकाळी सहा वाजेचे सुमारास मी व सोबत माझे मित्र दिपक पारसनाथ त्रिभुवन, महेश संजय त्रिभुवन, सौरव संजय त्रिभुवन असे गोळवाडी गावातील जिल्हा परीषद शाळेजवळ गप्पा मारत होती. तेव्हा • माझे मोबाईलवर बाबासाहेब अशोक शिंदे रा. रामनगर गोळवाडी यांनी फोन करुन तुला जास्त मस्ती आली कारे. तु माझ्या येथे कामाला का नाही आला व आमचे फोन का उचलत नाही. असे म्हणुन त्याने मला शिवीगाळ केली. म्हणुन मी हा प्रकार माझे वडीलांना सांगुन मी माझे वडील व मित्र दिपक पारसनाथ त्रिभुवन असे रात्री साधारण 08.30 वाजेचे सुमारास गोळवाडी येथील बालाजी निखाते यांचे घराजवळ जावुन तेथे बाबासाहेब शिंदे दिसल्याने त्यांना माझ्या वडिलांनी तु माझ्या मुलाला विनाकारण शिवीगाळ का केली असे विचारल्यामुळे बाबासाहेब शिंदे याने आम्हाला शिविगाळ करुन तुम्हाला जादा मस्ती आली का, असे म्हणुन आमच्याशी वाद घालुन लाथा मारुन त्याचे हातातील विळ्याने माझे डावे पायाला मारला.

            तेव्हा तेथे त्याचे दोन्ही पुतणे अक्षय शिंदे व विजय शिंदे तेथे आले व त्यांनी पण आम्हाला शिवीगाळ व लोटलाट करुन अक्षय शिंदे याने माझे डाव्या हाताला काठीने मारले. त्यानंतर तेथे गावातच राहणारे माझे नातेवाईक 1 ) संदीप रमेश पवार 2) सचीन संजय शिंदे 3) करण सारंगधर शिंदे 4) संजय बाबुराव शिंदे 5) विशाल सारंगधर शिंदे यांना माहिती मिळाल्यावरुन ते समजावण्यास मध्ये आले असता बाबासाहेब शिंदे याने हातातील विळ्याने विशाल याचे डावे पायावर मारहाण केली व सचीन वास डावे हाताचे मनगटावर व उजवे हाताचे बोटावर विळ्याने मारुन जखमी केले व संदीप पवार यांचे डावे खांद्यावर विळ्याने मारहाण केली. करण शिंदे याचे उजव्या हाताचे अंगठ्यावर विळ्याने मारहाण केली. संजय शिंदे यांचे उजवे हाताचे बोटावर विळ्याने मारहाण करुन सगळ्यांना जखमी केले. तसेच अक्षय शिंदे व विजय शिंदे यांनी त्यांचे हातातील काठ्याने आम्हाला सगळ्यांना हाता-पायावर, पाठीवर, अंगावर मारहाण करुन मुक्का मार दिला व तेथुन निघुन गेले. 

 

            आम्हाला मारहाण करणाऱ्या आमच्या गावातील गुंड प्रवृत्तीचे गुन्हेगार 1) बाबासाहेब अशोक शिंदे 2) अक्षय शिंदे 3) विजय शिंदे रा. रामनगर गोळवाडी यांनी मी त्यांचेकडे कामाला जाण्यास नकार दिल्याचे कारणावरून मला व माझेसोबतचे वरील नातेवाईकांना विळा, काठीने व लाथाने मारहाण करुन जखमी केल्याने त्यांचेविरुध्द कायेदशीर कार्यवाही व्हावी यासाठी फिर्याद दाखल केली आहे .

 

         या मारहाणीच्या घटनेनंतर वैजापूर तालुक्यामध्ये खळबळ उडाली आहे .सदर गुन्हेगारांवर भादवि कलम 324,323, 504, 34,3(2)( va ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास डि वाय एसपी महेक स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे .