2 मे 2012 नंतर शिक्षक भरती बंद असतानाही बोगस शिक्षक भरती, राहुरी तालुक्यातील नामांकित शिक्षण संस्थांवर प्रहार संघटना करणार प्रहार .

राहुरी तालुक्यामध्ये काही नामांकित शैक्षणिक संस्थांमध्ये शालेय शिक्षण व क्रिडा विभाग, मंत्रालय, मुंबई महाराष्ट्र राज्य यांच्या आदेशाने दि.02/05/2012 पासून नविन पद भरतीस व जाहिरात देण्यास परवानगी नसतानाही प्राथमिक आणि माध्यमिक विभागात मोठ्या प्रमाणात बोगस शिक्षक भरती करण्यात आली आहे .या शिक्षक पद भरतीसाठी जिल्हा शिक्षणाधिकारी तसेच उपसंचालक पुणे यांची कोणतीही लेखी परवानगी घेतलेली नाही .
शासनाने सुरू केलेल्या पवित्र पोर्टल द्वारे शिक्षक भरतीसाठी उमेद्वारांना विविध परिक्षा उत्तीर्ण असणे बंधनकारक केले असून अनेक नियम लागू केले आहे त्यामुळे शिक्षक होण्यासाठी उमेद्वारांची पूर्ण कसोटी पणाला लागत आहे . आजही पात्रता धारक उमेद्वार शिक्षक होण्यासाठी धडपडत आहेत .
बोगस शिक्षकभरती करण्यात आलेल्या संस्थामध्ये जे शिक्षक भरती झालेले आहेत त्यांनी पात्रता परिक्षा सुद्धा दिलेल्या नाहीत .याचा अर्थ संस्थांचे पदाधिकारी त्या शाळेतील मुख्याध्यापक व शैक्षणिक अधिकारी यांनी मिळून आपल्या पदाचा गैरवापर करत बोगस शिक्षक भरती केली आहे . या शिक्षकांमध्ये अनेक शिक्षक हे संस्थाचालकांच्या नात्यातील असल्याचे निदर्शनात येत आहे. आंम्ही शासकिय नियमांचे उल्लंघन करत नाही . कुणाचेही पैसे घेऊन काम करत नाही परंतू पैसे घेतल्याशिवाय कोणतेच काम होत नाही अशी अवस्था संस्थांची सुरु आहे . हा सर्व प्रकार पाहता मी नाही त्यातली आणि कडी लावा आतली असेच म्हणावे लागेल . .
सन 2012 पासून ते शासनाचे पवित्र पोर्टल सुरू होईपर्यंत ज्या संस्थांनी बोगस शिक्षक भरती करून आर्थिक कमाई करून घेतली आहे अशा संस्थांची बोगसगिरी ही लवकरच उघड होणार आहे . नाव मोठे अन् लक्षण खोटे असणाऱ्यांचे बिंग फुटणार आहे . यासाठी अहिल्यानगर प्रहार संघटनेने दंड थोपटले असून हा झालेला भ्रष्टाचार उघड होणार असल्याने संस्थाचालकांचे धाबे दणाणले आहेत . पवित्र पोर्टल मुळे बोगस शिक्षक भरतीला खीळ बसली असली तरी पवित्र पोर्टल सुरू होण्या आधिचा झालेला घोटाळा हा उघड होणार यात शंका नाही .