राहुरी तालुक्यातील खडांबे खुर्द येथील खळबळजनक घटना, आदिवासी दफन भूमीत अवैध पोयटा उत्खन्नननाबरोबर आदिवासींच्या थडग्यातील सापळेही गायब .
राहुरी तालुक्यातील खडंबे खुर्द येथील एक खळबळ जनक घटना समोर आली आहे .येथील आदिवासी दफनभूमीत अवैध पोयटा उत्खनना बरोबर आदिवासींच्या कबरीतील सापळेही गायब झाले आहेत .

सदर घटनेची हकीकत अशी की राहुरी तालुक्यातील मौजे खडांबे खुर्द गावातील आदिवासींच्या दफनभूमीतील पोयटा चोरून नेतांना एक जेसीबी तसेच एक चार ब्रासचा ढंपर रात्री एकच्या सुमारास गावातील आदिवासी तसेच -गावातील नागरीकांनी जप्त करून महसूल प्रशासन व पोलीस प्रशासन यांच्या स्वाधीन केला आहे.हा खळबळजनक प्रकार जनतेच्या सतर्कतेने तसेच लोक नियुक्त सरपंच अन्ना माळी यांनी उघड आणल्याने
अहिल्यानगर जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे . अवैध उत्खनन करणाऱ्या माफीयांनी आता आपला मोर्चा आदिवासी समाजाच्या दफनभूमीवर वळविल्याने या ठिकाणी दफन करण्यात आलेल्या व्यक्तींची अवशेष या माफीयांनी उत्खनना बरोबर गायब केले आहेत .त्यामुळे आदिवासी समाज हा पेटून उठला आहे . मृतांच्या थडग्यावर अन्याय होत असताना तालुक्याचे माजी मंत्री यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली . आदिवासी समाजाच्या दफनभूमी मध्ये अवैधरित्या पोयटा उत्खनन करणाऱ्या भगवान कल्हापूरे या व्यक्तीवर व त्याच्या वाहनांवर आदिवासी ॲक्ट- ॲट्रोसिटी तसेच वन - पोलिस - महसूल पर्यावरण या अंतर्गत गुन्हे दाखल त्वरित जेरबंद करून कार्यवाही करावी व सर्व आदिवासी समाजाला न्याय द्यावा अशा सुचना प्राजक्त तनपुरे यांनी राहुरीचे खमके तहसिलदार नामदेवजी पाटील तसेच गुन्हेगारांच्या मुसक्या आवळून त्वरीत जेरबंद करणारे पोलिस निरिक्षक संजय ठेंगे यांना केल्या आहेत .

यावेळी घटनास्थळी मोठा आदिवासी समाज व गावातील नागरीकांनी मोठी गर्दी केली होती . यामागे अनेकवेळा त्या गुन्हेगारांवर अवैध गौन खनिज चोरी प्रकरणी गुन्हे दाखल आहेत . भगवान कल्हापूरे याने मानुसकीच्या नावाला काळीमा फासला असून अशा गुन्हेगारावर त्वरीत कार्यवाही करून त्याला शिक्षा व्हावी अशी मागणी लोकनियुक्त सरपंच व नागरिकांनी केली आहे .प्रशासन यावर काय कार्यवाही करणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे .








