गौरव तांबे याने नीट परीक्षा मध्ये घवघवीत यश संपादन केल्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने सन्मान.

गौरव तांबे याने नीट परीक्षा मध्ये घवघवीत यश संपादन केल्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने सन्मान.

*गौरव तांबे याने नीट परीक्षेत यश संपादन केल्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने नागरी सन्मान.*

(प्रतिनिधी :- युनूस पठाण)नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील गौरव खंडेराव तांबे यांनी २०२५ या परीक्षेत ५२६ गुण प्राप्त करून राष्ट्रीय गुणवत्ता यादीत २६७९९ स्थान प्राप्त केल्याने सर्वत्र अभिनंदन व कौतुकाचा वर्षाव होत आहे. गौरव याने अहिल्याबाई होळकर शाळेत मधून दहावीच्या परीक्षेत ९३ टक्के गुण प्राप्त करून प्रथम क्रमांक मिळवला होता .तर तिथी सुद्धा जीनियर कॉलेज राहता येथे बारावीला ८५ टक्के गुण प्राप्त करून भरगोस हे संपादन केले होते.

   चांगल्या क्रमांकाने यश संपादन केल्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने गौरव याचा सन्मान करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नागरिक बाजीराव पाटील मुंगसे होते तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक करत सरपंच चंद्रकांत मुंगसे यांनी पुढील कार्यास शुभेच्छा देत अभिनंदन केले. तर खंडेराव तांबे यांनी आपल्या मुलाच्या जीवनाविषयी आपल्या मनोगतातून माहिती सांगत सर्वांचे आभार व्यक्त केले. यावेळी कचरू तांबे यांनी सावता मंडळाच्या वतीने मनोगत करत गौरव च्या पुढील कार्यास शुभेच्छा देत अभिनंदन केले.

     कार्यक्रमासाठी खरेदी विक्री संघाचे संचालक कडूभाऊ तांबे, सोसायटीचे व्हाईस चेअरमन जनार्धन देशमुख, माजी सरपंच दत्ता पाटील मुंगसे,मा. चेअरमन भानुदास मुंगसे, उद्धव मुंगसे, संभाजी काजळे, गणपत तात्या कोकरे, मुरलीधर मुंगसे, ग्रामपंचायत सदस्य अंबादास तांबे, कचरू तांबे, नारायण मुंगसे, बन्सी वांढेकर, अशोक तांबे, सुभाष मुंगसे , अशोक क्षीरसागर ,प्रशांत तांबे आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार पत्रकार युनूस पठाण यांनी केले

.