अहिल्याबाई होळकर शाळेच्या वतीने नवगात मुलांचे पेन ,पुष्प व पुस्तके देऊन जोरदार स्वागत.

अहिल्याबाई होळकर शाळेच्या वतीने नवगात मुलांचे पेन ,पुष्प व पुस्तके देऊन जोरदार स्वागत.

*अहिल्याबाई होळकर शाळेत नवगात विद्यार्थ्यांचे पेन व पुष्प देऊन जोरदार स्वागत.*

प्रतिनिधी (युनुस पठाण) :- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथे अहिल्याबाई होळकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथे इयत्ता पाचवी ला येणाऱ्या नवगत विद्यार्थ्यांचे शाळेच्या वतीने पेन व पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. शासनाच्या धोरणानुसार मुलांना पुस्तके मोफत वाटण्यात आले. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ पत्रकार बन्सी भाऊ एडके व पत्रकार युनूस पठाण लाभले. आलेले मान्यवरांचे स्वागत स्वरूपचंद गायकवाड सर यांनी केले.

     नेहमी मुलांच्या भवितव्यासाठी प्रयत्नशील असणारी ही अहिल्याबाई होळकर शाळा सुसंस्कृत शिक्षण दिले जाते. व मुलांना क्रीडा व विविध स्पर्धेमध्ये सहभाग अशा वेगवेगळ्या क्षेत्रात नवनवीन संधी निर्माण करून दिली जाते. या ठिकाणी कायम प्रयत्नशील असणारा शिक्षक वृंदांचा सुसज्ज स्टाफ आहे. त्यानिमित्ताने आज विद्यार्थ्यांची जोरदार स्वागत करण्यात आले.

     नूतन शाळा चालू झाल्यानंतर संस्थेअंतर्गत काही बदल्या होऊन नूतन शिक्षक या ठिकाणी रुजू झाले आहेत. जुने पर्यवेक्षक . डी .जी कदम सर यांची बदली होऊन त्या ठिकाणी राशिनकर सर हे पर्यवेक्षक म्हणून रुजू झाले आहेत. तर नवीन शिक्षक कोळेकर सर, कल्हापुरे सर , चंद्रकांत गायके सर ,मचे सर व पवार भाऊसाहेब इत्यादी अध्यापन करण्यासाठी विद्यालयात बदली होऊन आलेले आहेत. त्यांचेही शाळेच्या वतीने जोरदार स्वागत करण्यात आले.

   त्यानिमित्ताने वाढदिवस तुमचा शुभेच्छा शाळेच्या याप्रमाणे शाळेचे मुख्याध्यापक स्वरूपचंद गायकवाड व क्रीडाशिक्षक दसपुते सर यांचा वाढदिवस साजरा करत सन्मान करण्यात आला. 

       यावेळी श्री गोरे सर, श्री भुजबळ सर, श्री कोठुळे सर, श्री तोडमल सर, श्री वाघस्कर सर, श्री कोलते सर , श्री गायकवाड आर एन , श्री दसपुतें सर, श्री गायकवाड आर बी , श्रीम. मकासरे मॅडम इत्यादी अध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते .