माधवबाग क्लिनीक,श्रीरामपूर येथील घरफोडी स्थानिक गुन्हे शाखेकडून उघडकीस

माधवबाग क्लिनीक,श्रीरामपूर येथील घरफोडी स्थानिक गुन्हे शाखेकडून उघडकीस

अहिल्यानगर प्रतिनिधी// दि18

याबाबतचा सविस्तर वृत्तांत असा आहे की, दि.13/06/2025 रोजी फिर्यादी कैलास सोमाणी रा.सुर्यनगर, वॉर्ड नं.7, श्रीरामपूर यांचे माधवबाग क्लिनीक येथे अज्ञात आरोपीतांनी दरवाजाचा कोंडी तोडून क्लिनीकमध्ये प्रवेश करून दवाखान्यासाठी लागणारे, साहित्य व मेडीकल औषधे असा माल चोरून नेला.याबाबत श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल होता.

     पोलीस अधीक्षकांच्या आदेशावरून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर व पथकाने कारवाई करत .

दि 16 रोजी पथकाने घटनास्थळी भेट देऊन, आजुबाजुचे परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास करून सदरचा गुन्हा अभिषेक सुदाम दळवी, मिथून उर्फ मिठया गुलाब अडागळे, दोन्ही रा.श्रीरामपूर यांनी केल्याचे निष्पन्न केले. अभिषेक सुदाम दळवी व मिथुन उर्फ मिठया अशांना ताब्यात घेतले.ताब्यातील आरोपीकडे गुन्हयातील चोरीस गेलेल्या मुद्देमालाबाबत विचारपूस केली असता त्यांनी चोरी केलेला मुद्देमाल हा भंगार व्यावसायिक शाहरूख अय्युब पठाण, रा.वॉर्ड नं.1, श्रीरामपूर यास विक्री केल्याची माहिती सांगीतली. गुन्हयाचे तपासात पंचासमक्ष शाहरूख अय्युब पठाण, रा.वॉर्ड नं.1 श्रीरामपूर याने विकत घेतलेला 20,000/- रू किंमतीचा मुद्देमाल तपासकामी हजर केल्याने तो जप्त करण्यात आला आहे.  

ताब्यात घेण्यात आलेल्या 02 आरोपीस जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालासह श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले असून गुन्हयाचा पुढील तपास श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन हे करीत आहेत.