*जैन तीर्थ "सम्मेद शिखरजी" हे तीर्थक्षेत्रच राहणार; केंद्र सरकारची पर्यटन बाबत अधिसूचनेची स्थगिती*

*जैन तीर्थ "सम्मेद शिखरजी" हे तीर्थक्षेत्रच राहणार; केंद्र सरकारची पर्यटन बाबत अधिसूचनेची स्थगिती*

बी पी एस राष्ट्रीय लाईव्ह न्यूज नेटवर्क

प्रतिनिधी- सम्मेद तरटे (बार्शी)

बार्शी-          झारखंड मधील गिरीडिह जिल्ह्यातील जैन तीर्थ "श्री सम्मेद शिखरजी" बाबत पर्यटनस्थळाबाबतच्या अधिसूचनेला केंद्र सरकारने स्थगिती दिली. तसेच पर्यटन स्थळाचा दर्जा दिल्याने संपूर्ण जैन समाजाच्या देशव्यापी व पूर्ण भारतभर तीव्र विरोधानंतर केंद्र सरकारने हे तीर्थक्षेत्रच म्हणूनच कायम राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

तसेच श्री सम्मेद शिखरजी या तीर्थस्थळाच्या आजूबाजूचे पावित्र्य कायम राहण्यासाठी काही गोष्टींचे, बंदीचे आदेशही केंद्र सरकारने झारखंड सरकारला दिले आहेत. जैन समाजाच्या या तीव्र आंदोलनाला व मोर्चाला चांगलाच प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे संपूर्ण जैन समाजामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. या तीर्थक्षेत्राच्या आजूबाजूस 1)अमली पदार्थाची विक्री व सेवन करणे, 2)मोठ्या आवाजात संगीत वाजवणे, 3) मास विक्रीवर व मांसाहारास, 4)मोठ्याने लाऊड स्पीकर वापरणे, 5) त्या ठिकाणी पाळीव प्राणी आणण्यास, 6) कुठलीही निसर्गाला हानी पोहोचणारे कृत्य करणे असे सक्तीचे आदेश देण्यात आले आहेत. या सर्व बाबींचे काटेकोरपणे पालन करण्यात येणार असल्याचे झारखंड सरकार चे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी आदेश दिले आहेत. तसेच या ठिकाणी तीर्थक्षेत्राच्या चांगल्या व्यवस्थापनासाठी, देखरेखीसाठी मंडळाची स्थापना करण्यात येणार आहे.

महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान, झारखंड तसेच सर्व राज्यातून या तीर्थक्षेत्राच्या रक्षणासाठी सकल जैन समाजाने भारत बंद मोर्चा, तीव्र आंदोलने केले त्याचे पडसाद पूर्ण भारतभर उमटले. याची केंद्र सरकारने तत्परतेने दखल घेऊन हे पर्यटन स्थगितीचे आदेश दिले आहेत.