डार्क झोन मध्ये असलेल्या १२२ गावांचा पुनर्सर्वेक्षण करण्यात यावा - संजय डांगोरे, सभापती प.समिति

1.

काटोल:- काटोल तालुक्यातील डार्क झोन मध्ये असलेल्या गावांचा पुनर्सर्वेक्षन करून काटोल तालुक्या मधील गावे कमी करण्याबाबत  वरिष्ठ बहुवैज्ञानिक भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा नागपूर यांना  काटोल पंचायत समिती सभापती संजय डांगोरे यांनी निवेदनाद्वारे विनंती केलेली आहे. काटोल पंचायत समीती अंतर्गत १८८ गावे असून ,त्यापैकी १२२ गावे डार्क झोन मध्ये आहे .मागील तीन वर्षापासून सरासरी पेक्षा जास्त पाऊस झाला . आणि २०२२-२३ मध्ये सरासरी पेक्षा दुपटीच्या वर पर्जन्यमान झालेले आहे .त्यामुळे तालुक्यातील सर्व तलाव विहिरी भरलेले आहे ,तसेच भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा विभागांतर्गत काटोल तालुक्यात अटल भूजल योजनेअंतर्गत पाणी स्तर वाढविनेकरीता अनेक कामे सुरू सुद्धा आहे.

 त्यामुळे भूजल स्तर वाढलेला आहे .सदर १२२ गावे डार्क झोन मध्ये असल्यामुळे शेतकऱ्यांना नवीन विहिरीचा लाभ देता येत नाही. शेतकरी विहीरीचा लाभ घेन्यापासुन वंचीत राहु नये म्हनुन  सदर १२२ गावाचा पूर्ण पुनश्च सर्वेक्षण करून काटोल तालुक्यामधील असलेले गावे हे डार्क झोन मधुन कमी करण्यात यावे . यासाठी काटोल पंचायत समिती ने ०९ नव्हेबंर २२ ला   सर्वानुमते मासीक सभेत ठराव सम्मत केलेला  आहे. तथा जिल्हा परिषद नागपुर, महाराष्ट्र सरकार,केंद्र सरकार मधील संबधीत कार्यालयात  तशी माहीती पाठविल्याची माहीती सभापती संजय डांगोरे यांनी सांगीतले आहे.