लाडक्या बहिणीचे लाडके देवा भाऊ !
1.
काटोल:- कोंढाळी दुधाळा येथील लखोटिया सेलिब्रेशन हॉलमध्ये कोंढाळी जिल्हा परिषद सर्कलचा महिला मेळावा आयोजित करण्यात आला, या मेळाव्यात महिलांकरता उपयुक्त ठरणारी मुख्यमंत्री लाडली बहीण योजना आणि अनेक योजना ह्या महिला करीता किती फायद्याची आहेत या योजनेचे महत्त्व जीवनामध्ये फार जास्त आहे. या महाराष्ट्र सरकारच्या योजनेमुळे महाराष्ट्रातील महिलांचे तसेच युवा वर्गांची मान उंचावत आहे. याकरीता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपाची सरकार बसल्यास देवा भाऊच्या नेतृत्वात महिलांचा सन्मान करू शकते असे उद्गार नेते मंडळींनी मांडले.
लेक लाडकी योजनेच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन करण्याकरता ' लाडक्या बहिणीचा लाडका देवा भाऊ ' या कार्यक्रमांतर्गत काटोल विधानसभा नेते चरणसिंगजी ठाकूर, माजी आमदार डॉक्टर आशिषजी देशमुख, ज्येष्ठ नेते शेषरावजी चापले, महामंत्री दिनेशजी ठाकरे, जि प सदस्य पुष्पाताई चापले, पंचायत समिती सदस्या लताताई धारपुरे, देविदासजी कठाने, उकेशजी चव्हाण, जि प सदस्य समीरजी उमप, माजी सभापती संदीपजी सरोदे, सतीश रेवतकर, लक्ष्मीताई जोशी, योगेश चापले, प्रभारी हेमंत कावडकर, विस्तारक लालचंद चौधरी, शामरावजी तायवाडे, बालकिसन पालीवाल, सरपंच रंजूताई बारंगे, प्रीती गुजर, हिरा बारोकर, वछलाबाई वरठी, मंगलाताई काळबांडे, पद्मा खवसे, विना चौधरी, संगीता माकोडे, सुदर्शन झोडे, राजू धोटे, जीवन रेवतकर, मारुती चौधरी,प्रकाश बारंगे यांच्यासह हजारो महिला भगिनी उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक लता धारपुरे तर आभार प्रदर्शन पद्माताई खवसे यांनी मांडले या कार्यक्रमाचे आयोजक प्रमोद धारपुरे तथा निखिल जयस्वाल आणि भाजपा पदाधिकारी यांनी हा कार्यक्रम अतिशय यशस्वी पार पाडला.