विज क्षेत्रातील कंत्राटी कामगारांना सरकारने कायम करावे - संजय डांगोरे

1.

काटोल :- वीज क्षेत्रातील कंत्राटी कामगार गेल्या पंधरा-वीस वर्षापासून कार्यरत असून नियमित कामगाराप्रमाणे काम करीत असतात.फक्त 15 हजार मासीक पगार घेउन महावितरण ,महापारेषण ,महानिर्मित कंपनीच्या तथा राज्याच्या प्रगतीमध्ये कंत्राटी कामगारांचा मोलाचा वाटा आहे. इतर राज्यात कंत्राटी कामगारांना ज्याप्रमाणे सेवेमध्ये कायम केलेले आहे, त्याच पद्धतीने महाराष्ट्रातील वीज क्षेत्रातील कंत्राटी कामगारांना कायम करून त्यांना न्याय मिळवून द्यावा अशी काटोल पंचायत समिती सभापती संजयजी डांगोरे यांनी पालकमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती केलेली आहे.

  निराशेने ,अस्वस्थतेने ,असंतोषाने ,आक्रोशाने भरलेल्या या कंत्राटी कामगाराला न्याय मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने पुढाकार घ्यावा याकरिता कंत्राटी कामगारांनी अनेकदा शासनाकडे विनंती केलीली आहे.  काटोल पंचायत समितीचे सभापती संजयजी डांगोरे यांनाही काटोल तालुक्यातील जवळपास150 पेक्षा जास्त कंत्राटी कामगारांनी निवेदनाद्वारे मागनी उचलुन धरन्याची विंनती केली होती.काटोल पं.स.सभापती पद ग्रहण करताच डांगोरे यांनी आउट सोर्सींग कर्मचार्यांना सेवेत कायम करन्याची मागनी उचलुन धरुन तशी मागनी उपमुख्यमंत्री महोदयांना केलेली आहे.      तांत्रीक अँप्रेंटीस ,कंत्राटी कामगार असोसीएशनचे आकाश गुप्ता,अनिकेत येवले,चंद्शेखर ठाकरे,अनिल सोमकुवर,निलेश ढोले,शुभम रोंघे,सुरज उपासे,संकेत खरबडे,विशाल चरडे,मनोज येवले आदी या वेळी उपस्थीत होते.