माजी मंत्री आमदार शंकराव गडाख यांची देडगाव येथे सदिच्छा भेट निमित्त अनेक ठिकाणी जाऊन विविध विषयावर चर्चा.
नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथे देवी वस्ती परिसरामध्ये एका वांढेकर कुटुंबातील प्रथम पुण्यस्मरण निमित्त त्यांनी भेट दिली. व त्या कुटुंबाच्या दुःखामध्ये सहभागी होत त्या कुटुंबाचे सांत्वन केले. व त्या कुटुंबाला दुःखातून सावरण्यासाठी मोठा आधार दिला .
त्यानंतर देडगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे माजी चेअरमन साहेबराव कदम यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या तब्येतीची काळजी व विचारपूस करत व कृषी अधिकारी संजय कदम यांच्याशी तालुक्यातील कृषी खात्यातील योजना बाबतीत माहिती घेऊन गोरगरीब पर्यंत योजना कशा जातील याचा या विषयावर चर्चा करण्यात आली .
नंतर प्रगतशील बागातदार शेतकरी चंद्रभान पाटील कदम यांच्या निवासस्थानी भेट देऊन तेलकुडगाव रोड विषयी व अनेक विकासाबाबतीतील चर्चा करण्यात आली.
यावेळी नेवासा तालुक्याचे माजी उपसभापती कारभारी पाटील चेडे ,ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक बाजीराव पाटील मुंगसे ,बालाजी देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त भानदास पाटील गटकळ ,देडगाव चे विद्यमान सरपंच चंद्रकांत पाटील मुंगसे ,युवा नेते श्रीकांत हिवाळे ,महेश राजे चेडे, गणपत तात्या कोकरे , माजी सरपंच मच्छिंद्र मामा कदम , ज्ञानदेव कदम सर, विजय चेडे, वसंत मुंगसे, आदिनाथ कदम,माजी सरपंच दत्ता पाटील मुंगसे,गणेश मुंगसे सर, आदिनाथ वांढेकर, प्रवीण मुंगसे सर ,पत्रकार युनूस पठाण आदी मान्यवर या चर्चा साठी उपस्थित होते
.