आधार केंद्र अचानक बंद, ग्रामीण भागतील लाभार्थी व संगणक चालकांवर संकट .

आधार केंद्र अचानक बंद, ग्रामीण भागतील लाभार्थी व संगणक चालकांवर संकट .

 

*आधार केंद्र अचानक बंद : ग्रामीण भागातील लाभार्थी, संगणक चालकांवर संकट*

 

            राज्यभर महा आयटीआय सरकारी संस्थेमार्फत सुरू असलेली आधार नोंदणी सेवा अचानक थांबवण्यात आली आहे. परिणामी जिल्ह्यातील शासकीय आधार केंद्र बंद पडले आहेत.गेल्या काही वर्षात संगणक चालकांनी स्वतःच्या स्वखर्चाने लाखो रुपये गुंतवून आधार नोंदणीसाठी आवश्यक यंत्रणा उभारली होती आता अचानक घेतलेल्या निर्णयामुळे त्यांचा व्यवसाय उध्वस्त झाला आहे. विशेष म्हणजे या बदलाची कोणतीही पूर्व सूचना देण्यात आलेली नाही.

              राज्यातील ७५९ आधार नोंदणी संच एका दिवसात बंद करण्यात आले आहे.अहिल्यानगर जिल्ह्यातील शासकीय आधार केंद्र १मार्च २०२४ पासून आज अखेर बंद आहेत याचा फटका थेट लाभार्थींनाही बसत असून ग्रामीण भागातील नागरिकांना सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड अडचणींना सामोरे जावे लागत आहे. उन्हाचा पारा ४४ अंश सेल्सचे स्वर असून नागरिकांना शासकीय आधार केंद्रावर चकरा माराव्या लागत आहेत.अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये ७७ आधार मशीन मंजूर झाले असून तरी अद्याप पर्यंत शासकीय आधार केंद्र सुरू झालेली नाहीत.

          राहुरी तालुक्यातील शासकीय आधार केंद्र राहुरी बुद्रुक, राहुरी खुर्द, ब्राह्मणी ताराबाद,टाकळीमिया,सोनगाव वांबोरी,बारागाव नांदूर असे एकूण ८ शासकीय केंद्रांपैकी केवळ सोनगाव आणि वांबोरी हे दोन शासकीय आधार केंद्र चालू आहेत. यामुळे उरलेल्या ६ महसूल मंडल गावातील गरोदर माता,लहान बालके, दिव्यांग,वृद्ध व गरजू नागरिक आधार नोंदणीच्या प्रतीक्षेत आहे. अहिल्यानगर जिल्हाधीकारी डॉ पंकज आशिया यांनी लक्ष घालून त्वरित कायम स्वरूपी शासकीय आधार केंद्र सुरु करण्याच्या सूचना द्याव्यात अशी मागणी होत आहे

 

       .गेल्या अनेक दिवसांपासून ग्रामीण भागात शेतकरी आयडि,पोषण ट्रॅकरसह अनेक योजनांची अंमलबजावणी सुरू असताना आधार नोंदणी संच अचानक बंद करण्यात आले आहे यामुळे योजनांचे अंमलबजावणी ठप्प झाली आहे. याचा थेट परिणाम गरोदर महिलांवर, बालकांवर,दिव्यांग, वृद्धांवर नवीन नोंदणी तसेच बायोमेट्रिक ,शासकीय, शैक्षणिक,अनुदानवर होत आहे. लाभ मिळवण्यासाठी आधार आवश्यक असल्याने अनेकांना त्रास सहन करावा लागत आहे.