शिर्डी या धार्मिक ठिकाणी केंद्रीय संरक्षण मंत्री माननीय श्री. राजनाथ सिंह, मुख्यमंत्री महाराष्ट्र मा. श्री. एकनाथ शिंदे यांनी साईबाबा समाधी, द्वारकामाई व गुरूस्थानचे दर्शन घेऊन, पुजा व आरती केली.
श्रीरामपूर ( शिर्डी ) -- आज दि. ३१/०८/२०२३ रोजी जग प्रसिध्द शिर्डी या धार्मिक ठिकाणी केंद्रीय संरक्षण मंत्री माननीय श्री. राजनाथ सिंह, मुख्यमंत्री महाराष्ट्र मा. श्री. एकनाथ शिंदे यांनी साईबाबा समाधी, द्वारकामाई व गुरूस्थानचे दर्शन घेऊन, पुजा व आरती केली. महसूल मंत्री तथा पालकमंत्री मा. श्री. राधाकृष्ण विखे पाटील, नाशिक विभागीय आयुक्त श्री.राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी श्री. सिद्धाराम सालीमठ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. आशिष येरेकर, साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. पी.सिवाशंकर, जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. राकेश ओला उपस्थित होते. श्री साईबाबा संस्थानच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी पी.सिवाशंकर यांनी संरक्षण मंत्री श्री. राजनाथ सिंह, मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांचा श्री साईबाबा यांची मूर्ती भेट देउन सन्मानित केले. Delhi 91.com Bpslivenews Reporter ---Prakash Nikale. Shrirampur.