नेवासा तालुक्यात बांधकाम कामगारांना पंतप्रधान आवास योजनेचे घरकुल मंजूर
खेडले परमानंद प्रतिनिधी: -नेवासा तालुक्यातील बांधकाम कामगारांची नोंदणी करून भारतीय जनता पार्टी बांधकाम आघाडीचे जिल्हा संघटन सरचिटणीस श्री निवृत्ती जावळे व माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रातील बांधकाम कामगारांसाठी सरकार अनेक कल्याणकारी योजना राबवत असते त्यातील एक प्रमुख योजना म्हणजे अटल बांधकाम कामगार आवास योजना या योजनेमध्ये कामगारांना घरबांधणी करिता अर्थसहाय्य केले जाते माननीय *कामगार मंत्री सुरेश खाडे साहेब* यांना शिर्डी येथे माननीय भारतीय जनता पार्टी *जिल्हाध्यक्ष सतीश चव्हाण व जिल्हा सरचिटणीस निवृत्ती जावळे* व *भाजपा नेवासा शहर अध्यक्ष मनोज भाऊ पारखे* यांनी बांधकाम कामगारांचे घरकुल तातडीने सुरू करण्याकरिता निवेदन दिले होते या निवेदनाची दखल घेत मा. कामगार मंत्री साहेबांनी तात्काळ घरकुल योजनेचे प्रस्ताव मंजुरी करिता पाठवण्याचे आदेश दिले व त्याचे फलित म्हणून आज नेवासा तालुक्यातील बारा कामगारांचे घरकुलचे प्रस्ताव जिल्हा कार्यालयास पाठवण्यात आले होते त्या अनुषंगाने जिल्हा कार्यालयाने प्रस्ताव तात्काळ जिल्हा परिषदेकडे पुढील कार्यवाहीसाठी स्थळ पाहणी करून अहवाल मागवले असून नेवासा तालुक्यातील कामगारांच्या जागेची पाहणी झाली आहे लवकरच कामगारांचे घरकुलाचे काम सुरू होईल यासाठी मा.आ. बाळासाहेब मुरकुटे व भाजपा शहराध्यक्ष मनोज पारखे यांचे विशेष सहकार्य लाभले असून पुढील काळात अशाचप्रकारे नेवासा तालुक्यातील बांधकाम मजुरांना लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहू असे भाजपा जिल्हा सरचिटणीस निवृत्ती जावळे यांनी सांगितले.