कुकाना पोलीस दुरक्षेत्राशेजारी गाडीमध्ये बॉम्ब असल्याचा फोन आल्याने पोलिसांची मोठी धावपळ.
नेवासा तालुक्यातील कुकाणे येथील पोलीस दूरक्षेत्राजवळ उभ्या असलेल्या गाडीत बॉम्ब आहे व तेथे बॉम्बस्फोट होणार आहे असा खोटा फोन चौकीत आल्याने कार्यमग्न असणारे पोलीस कर्मचारी तुकाराम खेडकर, रामेश्वर घुगे व गवळी दादा पोलिसांमध्ये मोठी धावपळ उडून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. परंतु कुकाना पोलीस चौकीतील पोलिसांनी मोठ्या जिगरीने व शिताफीने तपास सुरू केला व गाडीची पाहणी तपासणी सुरू केली त्या गाडीमध्ये काही बॉम्बसदृश्य वस्तू आहे की काय याची खात्री केली. परिसरात मोठी शोधाशोध केली. जप्त केलेली वाहनेही सर्व तपासून पाहिली परंतु कोठेही संशयास्पद वस्तू आढळून आली नाही. त्यानंतर लक्षात आले की कुणीतरी खोटा कॉल आलेला आहे .
त्यानुसार कुकाना पोलिसांनी त्या कॉलचा तपास लावून तो कॉल भेंडा येथून आल्याचे निष्पन्न झाले. तर तो कॉल भेंडा येथील इसम इस्माईल बाबुलाल सय्यद यांनी केला होता.
हा सर्व प्रकार शुक्रवारी 4 रोजी साडेसात वाजता घडला असून या अगोदर इस्माईल सय्यद याच्या दोन बायकांनी घरातील भांडणावरून पोलिसाचा नंबर डायल करून तक्रार केली होती. त्यानंतर पोलीस घरी जाऊन त्याना समजही दिली होती. परंतु बायकाच्या मनस्तापातून त्याने फोन केला व पोलिसांना मनस्ताप केला.
पोलीस दूरक्षेत्रामध्ये खोटा कॉल केल्यामुळे व भीतीचे वातावरण पसरवल्यामुळे इस्माईल बाबुलाल सय्यद राहणार भेंडा. तालुका - नेवासा यांचे विरुद्धपोलीस कर्मचारी बाबासाहेब दहिफळे यांनी फिर्याद दिल्याने गु .रजी. नंबर 816 /2023 भादवी कलम 177 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खोटा कॉल बाबत वेळेत कर्तव्यदक्ष राहून कुकाना पोलीस क्षेत्रातील सर्व पोलीस कर्मचारी यांनी नेवासा पोलीस निरीक्षक शिवाजीराव डोईफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली या घटनेचे गांभीर्य घेता योग्य दिशेने तपासणी केल्याने परिसरातील लोकांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे. याबद्दल कुकाना परिसरातून पोलीस कर्मचाऱ्यांचे अभिनंदन व कौतुक होत आहे.