बालाजी देडगावच्या सोसायटीच्या अध्यक्षपदी महेशराव कदम तर उपाध्यक्षपदी रामभाऊ कोकरे यांची बिनविरोध निवड.
नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथे देडगाव विविध कार्यकारी सेवा सहकार सोसायटीच्या अध्यक्षपदी महेश लक्ष्मणराव कदम तर उपाध्यक्षपदी रामभाऊ नाथा कोकरे यांची सर्वानुमते बिनविरोध निवड झाली.
हा कार्यक्रम सोसायटीच्या हॉलमध्ये निवडणूक निर्णय अधिकारी श्री जी एम नांगरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. नेवासा तालुक्यात राजकीय दृष्ट्या अतिशय महत्त्वाचे समजले जाणारे पुरोगामी विचाराचे बालाजी देडगाव गावची काही दिवसापूर्वी निवडणूक होऊन बालाजी शेतकरी विकास पॅनलने 13.0 करत दणदणीत विजय मिळवला होता. हा पॅनल माजी जलसंधारण मंत्री नामदार शंकरराव गडाख साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक बाजीराव पाटील यांच्या नेतृत्वखाली करण्यात आला होता.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यमान सरपंच चंद्रकांत पाटील मुंगसे यांनी करत नूतन अध्यक्ष व उपाध्यक्ष हे चांगले काम करुन सभासदाचे हित जोपासतील व या भव्य सोसायटीचा कारभार पारदर्शक करतील ही अपेक्षा व्यक्त करत नवीन अध्यक्ष व निवडणूक अधिकारी व सभासद यांचे अभिनंदन करत सर्वाचे स्वागत केले.
आज दिनांक 18 रोजी निवडणूक अधिकारी नागरे साहेब व सर्व संचालक व ग्रामस्थांच्या उपस्थितीमध्ये सोसायटीच्या अध्यक्षपदी महेश लक्ष्मणराव कदम तर उपाध्यक्षपदी रामभाऊ नाथा कोकरे यांची बिनविरोध निवड घोषित करण्यात आली .या निवडीला सर्व संचालकांनी उत्स्फूर्त पाठिंबा दिला.
या निवडीबद्दल बालाजी देवस्थान ट्रस्टच्या वतीनेही नूतन अध्यक्ष व संचालकांचा सन्मान करण्यात आला.
कार्यक्रम प्रसंगी ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संचालक जनार्दन कदम, माजी चेअरमन कारभारी मुंगसे, मार्केट कमिटीचे संचालक कडूभाऊ तांबे, प्रगतशील कांदे शेतकरी बन्सी पाटील मुंगसे, माजी चेअरमन भानदास मुंगसे ,गणपत तात्या कोकरे, जेष्ठ पत्रकार बन्सीभाऊ एडके, मनोहर दादा बनसोडे, देडगावचे विद्यमान सरपंच चंद्रकांत मुंगसे, बालाजी देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष नवनाथ मुंगसे पाटिल, सचिव रामानंद मुंगसे, ह भ प बलभीम महाराज घोडके, अशोक पाटील मुंगसे, बंडू कदम, पत्रकार युनूस पठाण, संजय मुंगसे, माजी चेअरमन संदेश मुंगसे ,युवा नेते किशोर वांढेकर , व्यवसाय संघटनेचे अध्यक्ष किशोर मुंगसे, राजेंद्र पाठक,बालाजी देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त सुभाष मुंगसे, पत्रकार विष्णु मुंगसे, हरीभाऊ तागड , राम कुटे, भारत औटी, हरीभाऊ कदम , विस्वास हिवाळे, बाळासाहेब बनसोडे, अशोक कदम , भारत कोकरे,त्याचबरोबर नूतन संचालक बाबासाहेब पाटील मुंगसे, संजय पाटील मुंगसे, रामनाथ तांबे ,अरुणराव मुंगसे ,गंगासागर बनसोडे ,संदीप कुटे, योसेफ हिवाळे , रामनाथ गोयकर ,जनार्धन मुंगसे ,कचरू तांबे व सोसायटीचे सचिव रामा तांबे, कर्मचारी गोरख देवकाते, गणेश सुसे, राजेंद्र अंबाडे व आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार युनूस पठाण यांनी केले तर आभार गंगासागर बनसोडे यांनी मानले.