आहिल्यानगरचे स्थानिक गुन्हेशाखा अन्वेशन चे अधिकारी अधुनिक सट्टेबाजारच्या तपासासाठी गेले व स्वतः अडकले.

आहिल्यानगरचे स्थानिक गुन्हेशाखा अन्वेशन चे अधिकारी अधुनिक सट्टेबाजारच्या तपासासाठी गेले व स्वतः अडकले.

अहिल्यानगर च्या भारतात प्रसिद्ध असलेल्या शिर्डी येथे सुरु असलेल्या ग्रोमोअर इन्व्हेसमेंट फायनान्स कंपनी चे संचालक व इतरांनी चांगला परतवा देतो असे अमिष दाखवून फीर्यादींचा विश्वास संपादन करुन एकुण ८ लाख रुपयाची फसवणूक करून ते पसार झाले आहे अशा फीर्यादी वरून रहाता पो.ठाणे येथे गु.र.नं.२७३/ २०२५ बी.एन.एस २०२३ चे कलम ३१८(२).३१८(४)३१६(२).३(५) प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे त्याचा पूढील तपास आर्थिक गुन्हे शाखा करीत असतांना आरोपी चे नाव भूपेंद्र राजाराम सावळे. वय वर्ष २७ रा. नांदुर्खी रोड साईभक्ती भुषण निवास. श्रीकृष्ण नगर शिर्डी ता.रहाता जि. अहिल्यानगर यांचेकडे सदर तपासाच्या अनुषंगाने चौकशी केली असता त्याने शेअर मार्केटच्या चढ उतारामध्ये मोठ्या प्रमाणात घाटा झाल्यामुळे गुंतवणूकदारांचे पैसे परत करू शकलो नाही.

त्याच्याकडील जनतेच्या ठेवी व परतवाबाबत माहिती विचारली असता त्याने सांगीतले की दि.१५/o१/२०२५ रोजी मला स्थानिक गुन्हे शाखेचे पोसइ धाकराव व त्याच्या सोबतच्या तीन पोलीस कर्मचारी यांनी मी माझे दोन भाऊ व मित्र असे नाशिककडे फॉर्च्युनर गाडीने जात असता लोणी जवळ गाडी अडवून म्हणाले तुझ्याकडे कोणतेही आरबीआयचे लायसन्स नसतांना जनतेक जनतेकडून पैसे गोळा करून त्यांची फसवणूक करतो म्हणून तुझ्यावर गुन्हा दाखल करतो असे सांगीतले असता मी त्यांना म्हणालो माझ्यावर कोणतीही कार्यवाही करू नका मी कोणाचीही फसवणूक केली नाही मला विनाकारण कोणत्याही खोट्या गुन्ह्यात अडकवू नका त्यावर ते व त्यांचे सोबत असलेले कर्मचारी मला म्हणाले तुला जर यातून सुटायचे असेल तर तु आम्हाला १ कोटी ५० लाख रु.नगद स्वरूपात दे त्यावर मी धाकराव साहेब व सोबतच्या कर्मचारी यांना सांगीतले की माझ्याकडे नगद स्वरूपात पैसे नाहीत मी नगद पैसे देऊ शकत नाही असे म्हणालो तदनंतर त्यांनी आरोपी त्याचे भाऊ व मित्र यांना पोलिस अधिक्षक कार्यालय आहिल्यानगर येथील पार्कीग मध्ये घेऊन थांबले व धाकराव यांनी १ कोटी ५० लाख रुपये त्यांनी दिलेल्या अकाऊंट नंबरवर जमा केले अशी आरोपीने माहिती दिली त्याबाबत सदर तपासा दरम्यान चौकशी केली असता पोसई तुषार धाकराव व त्यांचे सोबतचे तीन अंमलदार यांनी सदर गैरकृत्य केल्याचे सकृत दर्शानी दिसून आले आहे

सदर बाबतच्या तपास अधिकारी यांनी दिलेल्या अहवालावरून दि.२१/ ०७/२०२५ रोजी पोसई तुषार छबुराव धाकराव, पोलिस अंमलदार १)पो.हे.कॉ./२१४५ मनोहर सिताराम गोसावी २)पो.हे.कॉ./४८६ बापूसाहेब रावसाहेब फोलाणे.३)पो.हे.कॉ.१२९३गणेश प्रभाकर भिंगारदे. सर्व नेम स्थानिक गुन्हे शाखा आहिल्यानगर यांना शासन सेवेतून निलंबीत करण्यात आले असून सदर बाबतची प्राथमीक चौकशी अधिकारी म्हणूनआर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शरद गोर्डे यांचेकडे देण्यात आला आहे.