नगरसेवक श्री . संपतदादा बारस्कर यांचा वृक्ष संवर्धन व संगोपन या कार्यासाठी सिने अभिनेते श्री . मकरंद अनासपुरे यांनी केला सत्कार .

नगरसेवक श्री . संपतदादा बारस्कर यांचा वृक्ष संवर्धन व संगोपन या कार्यासाठी सिने अभिनेते श्री . मकरंद अनासपुरे यांनी केला सत्कार .

                  झाडे लावा झाडे जगवा हा संदेश सर्वांना माहित आहे परंतु प्रत्यक्षात अंमलबजावणी होताना दिसत नाही .आधुनिकीकरणाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात वृक्षतोड करण्यात आलेली आहे त्याचा परिणाम कोरोना काळात सर्वांना अनुभवयास आला आहे .ऑक्सीजन मिळवण्यासाठी झालेली धडपड पाहून अहमदनगर चे नगरसेवक व विरोधी पक्षनेते मा. श्री . संपतदादा बारस्कर यांनी अहमदनगर शहर हिरवेगार व्हावे यासाठी त्यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त घर तेथे झाड हा उपक्रम राबवण्याचे काम केले आहे .त्यांच्या या उपक्रमाबद्दल मराठी सिनेअभिनेते श्री .मकरंद अनासपुरे यांनी शाल व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान केला आहे .या कार्यक्रमप्रसंगी मा .आमदार संग्राम भैय्या जगताप,विशेष सरकारी वकील पद्मश्री उज्वल निकम, आमदार श्री अरुण काका जगताप, नगसेवक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते .

 

      श्री. संपत बारस्कर यांनी आपला वाढदिवस आंब्याची रोपे वाटप करून एक घर एक वृक्ष हा उपक्रम राबवून साजरा केला आहे .वृक्ष आपणास शुद्ध प्राणवायू देण्याचे काम अहोरात्र करत असतात असे प्रतिपादन यावेळी उपमहापौर गणेश भोसले यांनी केले आहे .एक घर एक वृक्ष उपक्रमांतर्गत आंब्याच्या रोपांचे वितरण करतेवेळी राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा.माणिकराव विधाते,सभापती कुमार सिंह वाकळे, नगरसेवक अविनाश घुले, नगरसेवक डॉ.सागर बोरुडे, माजी उपमहापौर अनिल बोरुडे, नगरसेविका मीनाताई चव्हाण,नगरसेवक प्रकाश भागानगरे,नगरसेवक निखिल वारे,सुनील त्रिंबके, सामाजिक कार्यकर्ते संभाजी पवार, साधना बोरुडे, रंजना उकिरडे,नितीन बारस्कर,गणेश बारस्कर आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

 

     मनपा विरोधी पक्ष नेता म्हणून काम करणारे संपत बारस्कर हे विकासाच्या कामाबरोबरच पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण व संवर्धन ही काळाची गरज आहे हे ओळखून आणि ही संकल्पना प्रत्यक्ष कृतीत उतरवून प्रभाग क्रमांक 1 मध्ये मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करून त्याचे संवर्धन करत आहे .त्यांच्या माध्यमातून शहरात लवकरच मोठ्या प्रमाणात वृक्षाची लागवड करण्यात येणार आहे .या वृक्ष लागवड चळवळीसाठी त्यांनी प्रभाग क्रमांक 1 मध्ये मागेल त्या कुटुंबाला एक आंब्याचे रोप दिले आहे .हे आंब्याचे रोप सुमारे 10 ते 12 फूट उंचीचे असून लवकरच त्याचे मोठ्या वृक्षामध्ये रुपांतर होणार आहे त्यामुळे या परिसरामध्ये झाडाच्या माध्यमातून हिरवळीचे स्वरूप प्राप्त होणार आहे .

 

       सध्या पर्यावरणाच्या ऱ्हासामुळे नागरिकांना विविध संकटांना सामोरे जावे लागत आहे .पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण व संवर्धन ही काळाची गरज आहे .यासाठी प्रभागातील प्रत्येक नागरिकांच्या घरासमोर एक आंब्याचे झाड लावण्यात आले आहे .या चळवळींमध्ये सर्व नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी BPS LIVE NEWS शी बोलताना सांगितले आहे .