पत्रकार सुखदेव फुलारी यांची जलयुक्त शिवार अभियान तालुकास्तरीय समितीच्या सदस्यपदी निवड.

पत्रकार सुखदेव फुलारी यांची जलयुक्त शिवार अभियान तालुकास्तरीय समितीच्या सदस्यपदी निवड.

*सुखदेव फुलारी यांची जलयुक्त शिवार अभियान तालुकास्तरीय समितीच्या सदस्यपदी निवड*

 

बालाजी देडगाव ( प्रतिनिधी युनूस पठाण):--

महाराष्ट्र शासनाची महत्वाकांक्षी योजना "जलयुक्त शिवार अभियान २.०" अंतर्गत नेवासा तालुकास्तरीय समितीच्या सदस्य पदी (तज्ञ व्यक्ती, जलसंधारण) भेंडा येथील जलमित्र सुखदेव एकनाथ फुलारी यांची 

निवड करण्यात आली आहे.

 

 "जलयुक्त शिवार अभियान २.०" ही महाराष्ट्र शासनाची महत्वाकांक्षी योजना असुन विविध मंत्रालयाचा हा एकत्रित उपक्रम आहे. जलयुक्त शिवार अभियान २.० अंतर्गत राज्यातील प्रत्येक तालुक्याला तालुका कार्यान्वित यंत्रणेचे प्रतिनिधी मिळुन तालुकास्तरीय समितीची स्थापना करण्यात आलेल्या आहेत.

जिल्हास्तरीय समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ

यांचे संमतीने नेवासा तालुकास्तरीय समितीचे अध्यक्ष तथा नगर विभागाचे उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील यांनी या समिती मध्ये तज्ञ व्यक्ती जलसंधारण म्हणुन जलमित्र सुखदेव एकनाथ फुलारी यांची निवड केली आहे.

नेवासा उपविभागीय जलसंधारण अधिकारी प्रवीण दहातोंडे निवडीचे पत्र श्री.फुलारी यांना दिले.

 

गट विकास अधिकारी हे या

तालुकास्तरीय समितीचे सहअध्यक्ष तर उपविभागीय कृषि अधिकारी,

तहसिलदार,उपविभागीय अभियंता (पाणी पुरवठा),उपविभागीय अभियंता (जलसंपदा),तालुका कृषि अधिकारी,उपविभागीय जलसंधारण अधिकारी (जि.प.जं.पा),वन परिक्षेत्र अधिकारी(वन विभाग),वन परिक्षेत्र अधिकारी (सामाजिक वनीकरण)

तज्ञ व्यक्ती (जलसंधारण), अशासकीय संस्थेचे प्रतिनिधी हे सदस्य असून उपविभागीय जलसंधारण अधिकारी(मृद व जलसंधारण विभाग) हे सदस्य सचिव आहेत.

 "जलयुक्त शिवार अभियान २.०"

या अभियानासंदर्भात तालुकास्तरीय जल आराखडा सर्व यंत्रणेच्या समन्वयाने तयार करुन जिल्हास्तरीय समितीला सादर करणे, शिवार अभियान २.०' मध्ये निवडण्यात आलेल्या गावांमध्ये गाव शिवार फेरी घेऊन गाव आराखडे अंतिम करणे,आढावा बैठका घेणे 

 हे या समितीचे काम आहे.