राहुरी पोलिसांचे ऑपरेशन मुस्कान अंतर्गत १०६ अल्पवयीन मुलींचा शोध

राहुरी पोलिसांचे ऑपरेशन मुस्कान अंतर्गत १०६ अल्पवयीन मुलींचा शोध

 * दि. 23/02/2026* 

राहुरी ता प्रती -  डॉ देवेंद

 ***सिन्नर येथून रागाने घरातून निघून आलेली मुलगी काही अनर्थ घडायचे आत तत्पर राहुरी पोलिसांनी केली आई - वडीलांचे स्वाधीन* 

राहुरी पोलिसांचे ऑपरेशन मुस्कान अंतर्गत १०६ अल्पवयीन मुलींचा शोध 

दिनांक 22/02/2026 रोजी रात्री 20.00 वाचे सुमारास राहुरी पोलीस स्टेशन हद्दीत पोलीस अंमलदार प्रमोद ढाकणे व नदीम शेख यांना पेट्रोलिंग करत असताना राहुरी बस स्टॅन्ड या ठिकाणी एक १३ वर्षीय अल्पवयीन मुलगी बस स्टँड परिसरात फिरत असताना दिसल्याने व तिच्या चेहऱ्यावरील हावभाव भेदरलेले दिसल्याने तिच्याकडे विचारपूस केली असता ती सिन्नर येथून घरून निघून आल्याचे सांगितल्याने तिस राहुरी पोलीस स्टेशन येथे घेऊन येऊन तिचे नातेवाईक संदर्भात विचारपूस केली असता तिने तिचे वडील हे सिन्नर या ठिकाणी राहत आहेत असे सांगितल्याने सिन्नर एमआयडीसी पोलीस स्टेशन या ठिकाणी कॉल केला असता त्यांना सदर मुलीची माहिती दिली व त्यांनी मुलीचे वडील यांच्याशी संपर्क केला व मुलगी त्यांचीच आहे असे त्यांनी कळवल्याने , (सदर अल्पवयीन मुलीचा मिसिंग-अपहरण गुन्हा दाखल होणेपूर्वीच )ते सिन्नर येथून राहुरी पोलीस स्टेशन येथे येऊन त्यांची मुलगी त्यांच्या ताब्यात सुखरूप दिली.

सदर कारवाई मा. सोमनाथ घार्गे पोलिस अधीक्षक सो, अहिल्यानगर , मा. सोमनाथ वाघचौरे अपर पोलिस अधीक्षक श्रीरामपूर , मा. जयदत्त भवर उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपुर विभाग जि. अहिल्यानगर यांच्या मार्गदर्शनाखाली श्री संजय आर.ठेंगे पोलीस निरीक्षक राहुरी पोलीस स्टेशन यांचे नेतृत्वात पोसई गणेश वाघमारे, पोलीस हवालदार संजय राठोड, बाबासाहेब शेळके ,पो कॉ कोळी पो. कॉ. प्रमोद ढाकणे, सतीश कुराडे, नदीम शेख, सचिन ताजने ,गणेश लिपने , यांनी केले आहे.

राहुरी पोलिसांचे तत्पर कारवाई बाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून तसेच नागरिकान कडूनही कौतुक करत अभिनंदन करण्यात येत आहे